Rare PuLa footage to mark humorist’s birth centenary celebrations in Nov

: Pulotsav, the annual festival held to commemorate the life of the multi-faceted humorist Purushottam Laxman ‘PuLa’ Deshpande will take an international turn this year in order to mark his 100th birth anniversary.

The organizers also intend to screen rare footage obtained from his family during the festival.

“We have contacted several branches of Maharashtra Mandal located all over the world to organize local chapters of the Pulotsav.

We are planning to take the festival global this year, to mark his 100th birth anniversary.

We have received a positive response from many of them already,” said Virendra Chitrav of the Aashay Film Club, one of the coordinators of Pulotsav.

On November 8, when the centenary celebrations are scheduled to kick off, mayor Mukta Tilak will unveil a new logo for the Global Pulotsav.

Two films will also mark the occasion.

Vakta Dashasahestrashu, to be screened on November 8, has been spliced together from footage obtained from the family archives while the other film is a documentary about Pulotsav itself.

“Vakta Dashasahestrashu will feature three speeches he made.

Two of them are speeches about drama and music.

The Deshpande family has been very kind in giving us the footage,” Chitrav added.

‘पुलकभूषण’ पुरस्कार

सन्मानपूर्वक प्रदान

“आपलं आयुष्य हे दुसर्‍याच्या जीवनात प्रकाश देणारं असावं. पण त्यापेक्षाही जर आपण उदबत्तीसारखं आयुष्य जगलं तर कितीही मोठा वारा आला तरी आपल्या चांगल्या कामाचा सुगंध दुरवर दरवळत राहतो. दिवा विझवता येतो किंवा वार्‍याने विझतो. पण उदबत्ती विझवता येत नाही किंवा वाराही तिला विझवू शकत नाही, अशी उदबत्ती सारखी सुगंधीत जीवन असे धारीवाल आणि बडजात्या कुटुंबियांचे आहे” असे गौरवोद्गार दिगंबर जैन मुनीश्री प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांनी आज येथे काढले. मुनीश्रींचा पुण्यात चालू असलेल्या चातुर्मासपर्वात धर्मानुरागी रसिकलाल एम. धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालेल्या पहिल्या प्रतिष्ठेच्या ‘पुलकभूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. दानशूर उद्योगमहर्षी कै. रसिकलाल एम. धारीवाल यांच्या वतीने त्यांची पत्नी श्रीमती शोभा धारीवाल व कन्या जान्हवी धारीवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी कुटुंबियांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला. मुनीश्री पुलकसागर महाराजांच्या हस्ताक्षरातील चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी हजारो जैन भाविकांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर धुमधुमून गेला.

याप्रसंगी मुनीश्री म्हणाले की, या दोघांवरही ईश्वराचा वरदहस्त आहे. त्यांच्याकडे संपत्ती आहे. असे असूनही त्यांनी संस्कार सांभाळून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. धारीवाल यांनी केलेली सामाजिक कामे आणि बडजात्या यांच्या चित्रपटाची नावे लोकांच्या तोंडी असतात. पण या दोघांची नावे संतांच्या तोंडी असतात हे विशेष. रसिकलाल धारीवाल यांनी वर्तमान युगात आपल्याकडे असलेले भांडार समाजासाठी खुले करून कोट्यावधी रुपयांचे दान केले व नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे जेवढी जोरात हवा येईल तेवढा त्यांच्या कार्याचा सुगंध दुरवर पसरेल. बडजात्या हे चित्रपट दुनियेत आहेत. या प्रभावी माध्यमाचा वापर करून ते चांगले कौटुंबिक संस्कार समाजात रूजवतात. या सगळ्यांचं श्रेय बडजात्या कुटुंबाला एकत्रित बांधुन ठेवणार्‍या उषा बडजात्या यांना आहे असे ते म्हणाले.

याप्रसंगी श्रीमती शोभा धारीवाल म्हणाल्या, जीवनातील कठीण प्रसंगात मुनीश्रींचा परिचय झाला. जीवनातील सत्य स्विकारण्याची ताकद त्यांच्यामुळे मला व कुटुंबाला मिळाली. त्यामुळेच आज या चार्तुमासपर्वाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मला पार पाडता आली आणि यामुळे मला एक चागले काम करता आले. यानिमित्ताने चार्तुमास संयोजन समितीच्या रूपाने एक चांगला परिवार मला मिळाला.

जान्हवी धारीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे समाजाकडून मिळालेले पुन्हा समाजाला देण्याचे काम केले. हे काम आपण असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचे नाव मोठे केले तसे मी माझ्या वडिलांचे नाव मोठे करीन.

याप्रसंगी सुरज बडजात्या म्हणाले, आमचा एक चित्रपट चांगला चालला. त्यानंतर आम्ही घरी स्नेहभोजन आयोजित केले होते. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आले होते. पण स्नेहभोजनाप्रसंगी ‘काहीच’ नाही असे बघून अनेकजन न जेवता परत गेले. तर काहींनी ‘ही काय जीवनशैली आहे काय’ असे उद्गार ही काढले. मात्र ‘असेच स्नेहभोजन’ तुम्हाला सन्मान मिळवून देईल असे कुटुंबातील ज्येष्ठांनी सांगितले. असे कौटुंबिक व संस्कारी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे व त्यात यश मिळवणारे सूरज बडजात्या यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री प्रदीप जैन म्हणाले की, धर्म हे समाज जोडण्याचे काम करतो. त्यामध्ये जोडण्याच्या आशयाला खूप महत्व आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा कायम रहावा यासाठीची पहिली बैठक पुण्यात झाल्याची आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली. याप्रसंगी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मल सेठी उपस्थित होते.

प्रारंभी नृत्याविष्कार झाल्यावर मुंबईच्या सीमा गंगवाल यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे केले. यानंतर कै. रसिकलाल एम. धारिवाल यांचे कर्तृत्व अधोरेखीत करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच मंगलाचरण नृत्याविष्कार स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक – वैष्णवी शहा ग्रुप, द्वितीय क्रमांक – जिनेंद्र ग्रुप आणि पारस ग्रुप, तृतीय क्रमांक – पूर्वाशहा ग्रुप, उत्तेजनार्थ – श्राविका महिला मंडळ, जैन जागृती सखी मंच, पार्श्व पद्मावती मंडळ आणि संगिनी ग्रुप. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.

तत्पूर्वी आज सकाळी माणिकबाग जैन मंदीर येथून भव्य शोभायात्रा निघाली. त्यामध्ये बँड, रथ, बग्गी यासह पारंपारिक पोशाखातील हजारो जैन स्त्री-पुरूष भावीक सहभागी झाले होते. ही शोभा यात्रा महालक्ष्मी लॉन्स येथे आल्यावर तेथे डोक्यावर मुकुट परिधान केलेले 1008 स्त्री पुरूष (इंद्र व इंद्रायणी) यांनी महाअर्चना विधान महोत्सव पूजा सुरू केली. याप्रंसगी अन्य हजारो जैन भावीक उपस्थित राहिले होते. महाअर्चना विधान महोत्सव पूजा दि. 22 व 23 रोजी सकाळी 7 ते 10 यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होईल अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी दिली.

फोटो ओळ ः

1) धर्मानुरागी रसिकलाल एम. धारीवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे मुनीश्री पुलकसागर महाराजांच्या उपस्थितीत महाअर्चना विधान महोत्सव पूजा करताना 1008 स्त्री व पुरूष (इंद्र व इंद्रायणी).

2) पहिला ‘पुलकभूषण’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान कार्यक्रमात डाविकडून सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर.एम.धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल, श्रीमती शोभा धारीवाल, श्री. सुरज बडजात्या, सौ. बडजात्या व उपाध्यक्ष चकोर गांधी.

पुणे नवरात्रौ महोत्सव

मराठी झिंगाट गाण्यांनी
गणेश कला क्रीडा रंगमंच दणाणले.

महाराष्ट्रभर गाजत असलेल्या झिंगाट गाण्यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाची सांगता दणक्यात झाली. श्रोत्यांनी वेळोवेळी शिट्ट्यांनी गायकांना आणि गाण्यांना दाद दिली.

आली गं गोंधळाला आई तुळजाभवानी आई, आई भवानी तुझ्या कृपेने हे गोंधळ तसेच शांताबाई, सुया घे पोत घे, पप्पी दे, आलाय माझा मंत्री, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का, मला आमदार झाल्यासारखं वाटतय, पोरगी आली रंगामधी, आला बाबुराव आला, त्याच्या प्रियेने केला गफला अशी एका पेक्षा एक गाजलेली गाणी त्या गाण्यांच्या मूळ गायकांनी सादर केली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. प्रदीप कांबळे, संजय लोंढे, रोमिओ कांबळे, संकल्प गोळे, सचिन अवघडे, राखी चौरे, अजय क्षीरसागर, भाग्यशाली क्षीरसागर, शेखर गायकवाड, विशाल यांनी आपल्या बुलंद आवाजांमध्ये ही गाणी सादर केली. त्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. दाक्षिणात्य अभिनेत्री पौर्णिमा कुलकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनीही शांताबाई गाण्याला नृत्याची साथ दिली. उमेश डोळे, प्रमोद शेंडगे, संतोष, गुरु यांनी संगीताची साथसंगत केली. जितेंद्र वायकर, केतन पेंडसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमित बागुल आणि प्रदीप कांबळे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम श्रोत्यांची दाद मिळवून गेला.

सुमित कंपनीचे सुभाष परदेशी, महापालिकेचे अधिकारी श्रीनिवास कंदुल यावेळी उपस्थित होते. त्यांचा आणि सर्व कलाकारांचा सत्कार महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली गाणी पुण्यात तयार होत आहेत याचा मला अभिमान वाटतो असे यावेळी बागुल यांनी सांगितले. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ.जयश्री बागुल, महोत्सव समितीतील नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, विकी खन्ना उपस्थित होते. घनश्याम सावंत यांनी आभार मानले.

फोटो ओळी
पुणे नवरात्रौ महोत्सवात महाराष्ट्राचा बुलंद आवाज कार्यक्रमात संजय लोंढे यांनी ‘ शांताबाई ‘ हे अतिशय लोकप्रिय गाणे गुरुवारी सादर केले . दाक्षिणात्य अभिनेत्री पौर्णिमा कुलकर्णी हिनेही ठेका धरला . प्रदीप कांबळे , जितेंद्र वायकर यांनी साथ दिली .

उद्योगमहर्षी रसिकलाल धारीवाल आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या
पहिल्या ‘पुलकभूषण’ पुरस्काराचे मानकरी
दि. 21 ऑक्टोबर रोजी भव्य प्रदान समारंभ

दानशुर उद्योगमहर्षी रसिकलाल एम.धारीवाल आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना यंदाचा पहिला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील ‘पुलकभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी सायं. 4 वाजता दिगंबर जैन मुनिश्री प.पु. 108 पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वे नगर, पुणे येथे समारंभपूर्वक दिला जाणार आहे. चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याअध्यक्ष मिलिंद फडे व उपाध्यक्ष चकोर गांधी यांनी दिली . या प्रसंगी समितीचे सचीव जितेंद्र शहा आणि सहचिटणीस संजय नाईक उपस्थित होते .
राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, शाकाहार-अहिंसा या मानवी मुल्यांशी असणारी वैचारिक बांधिलकी, समाजात सातत्याने पायाभूत व दिशादर्शक काम, समाजातील दुर्बल घटकांना शैक्षणिक व वैद्यकीय साहाय्य देण्यासाठी संस्था व सुविधांची उभारणी अशा विविध निकषांवर आधारित दरवर्षी दोन स्त्री अथवा पुरूष व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणताही धर्म, प्रांत, भाषा, लिंग याचा भेद न करता हा पुरस्कार दरवर्षी घोषित होऊन मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या दरवर्षी होणार्‍या चातुर्मास स्थळी या पुरस्काराचे वितरण केले जाईल.
रसिकलाल एम. धारीवाल – केवळ जैनच नव्हे तर सर्वच धर्मियांमध्ये आस्था बाळगणारे दानशुर उद्योगमहर्षी हा नावलौकिक मिळवलेले रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धर्मसंस्कार अशा विविध क्षेत्रात सातत्याने महत्वाचे योगदान दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे त्यांचा जन्म
1 मार्च 1939 ला झाला. वडिल माणिकचंद यांच्या अकाली निधनानंतर मातोश्री श्रीमती मदनबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खडतर जीवन प्रवास सुरू केला. मात्र उद्यमशीलता, कर्तबगारी, जिद्द, दूरदृष्टी आणि धार्मिक संस्कार या पंचसूत्रीच्या आधारे त्यांनी सर्वच क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी उभारलेल्या माणिकचंद उद्योग समुहाने देशात मानाचे स्थान मिळविले आहे. पानमसाला, तंबाखू उत्पादने, माउथ फ्रेशनर, इलेक्ट्रिकल स्विचेस, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेग्जिबल पॅकिंग, बांधकाम व्यवसाय, पवनचक्या, ऑक्सिरिच मिनरल वॉटर, चहा आणि काडेपेटी अशा महत्वपूर्ण क्षेत्रात त्यांच्या सर्व उत्पादनांनी केवळ दबदबा निर्माण केला असे नाही तर गुणवत्तेवर सदैव भर देऊन त्यांनी सर्व उत्पादने सदैव अग्रेसर ठेवली. त्यांचा व्यवसाय पुणे, दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, बडोदा आणि आसाम येथे विस्तारला आहे. देशामध्ये अनेक उत्पादनांची त्यांचे वितरक म्हणून मोठी वितरण व्यवस्था त्यांनी उभारली. त्यांची अनेक उत्पादने 50 हून अधिक देशात निर्यात होतात. ‘उंचे लोग-उंची पसंद’ हे त्यांचे ब्रँड नेम सर्वत्र लोकप्रिय झाले.
उद्योग महर्षी रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योगाप्रमाणेच सामाजिक जबाबदारीची जाण ठेऊन अनेक समाजोपयोगी उपक्रम उभे केले. तसेच समाजासाठी चांगले काम करणार्‍या संस्थांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले. शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कायमस्वरूपी समाजोपयोगी कामे उभारतानाच भूकंप, पूर अशा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्यावेळी देखील माणिकचंद उद्योगसमूह मदत करण्यासाठी सदैव पुढे सरसावला. लाखो गरजू, तरूण नागरिकांच्या चेहर्‍यावरील हास्य व समाधान हेच उद्योगसमूहाचे यश असे ते मानत राहिले.
शैक्षणिक पातळीवर त्यांनी अनेक संस्था उभारल्या तसेच हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळण्याची व्यवस्था केली. शिरूर, पुणे येथे अनेक महत्वपूर्ण शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याचबरोबर पुण्यात मुलींचे वसतीगृह, चांदवड (नाशिक) व तळेगाव येथे मुलांचे वसतीगृह उभारून त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी सोय केली. त्याचप्रमाणे शिरूर, पावापुरी (बिहार), चिंचवड, गणेगाव, उदयपूर, अलिगड, पुणे, उज्जैन, वैजापूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या शिक्षण संस्थांचे देखील माणिकचंद उद्योगसमूह आधारस्तंभ आहेत. गरजू विद्यार्थ्यांना चांगली शिष्यवृत्ती देता यावी यासाठी त्यांनी आठ कोटी रुपयांचा ट्रस्ट निर्माण केला.
वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभारले. माणिकचंद उद्योग समुहाने गरीब रुग्णांसाठी माफक दरात अथवा निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यासाठी अद्ययावत इस्पितळांची निर्मिती केली. तसेच देशातील अनेक इस्पितळांना मोठा आर्थिक सहयोग दिला. त्यातूनच पुण्यात नर्सिंग कॉलेज व होस्टेलही सुरू झाले. पुणे, नगर, औरंगाबाद, अलिगड, पालिठाणा अशा अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली हॉस्पिटल्स् अद्ययावत करण्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले.
सामाजिक पातळीवर लातूर व गुजरातचा भूकंप,आंध्रमधील वादळ, कारगिल युद्ध अशा प्रत्येक वेळी माणिकचंद उद्योगसमूह मदतीसाठी पुढे सरसावला. अलिगड व पानशेत येथे वृद्धाश्रमही उभारलेले.
धार्मिक पातळीवर, पालिठाना येथील शत्रूंजय तिर्थ, शिखरजी येथे धर्मशाळा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील धार्मिक स्थळांना आर्थिक सहाय्य करून त्यांनी मोठे योगदान दिले.
सुरज बडजात्या – 22 फेब्रुवारी 1965 मध्ये जन्मलेले सुरज बडजात्या यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट सृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांचा ‘सारांश’, दिग्दर्शक हिरेंद्र नाग यांचा ‘अबोद’, टिव्ही सिरीयल ‘पेईंग गेस्ट’ आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’ यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले. याच काळात लेखक व दिग्दर्शक म्हणून ही ते नावारूपास आले. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘मै प्रेम की दिवानी हूँ’, ‘विवाह’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनात त्यांनी आपल्यातील गुणांची चमक दाखवली. राजश्री प्रोडक्शन समवेत त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्ये प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून काम केले.
1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. एवढेच नव्हे तर गेल्या 70 वर्षातील देशातील 10 यशस्वी चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. या चित्रपटामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1994 मध्ये राजश्री प्रोडक्शनचा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने केवळ रौप्य महोत्सवच साजरा केला असे नाही तर देशातील पहिल्या 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. या चित्रपटाने तब्बल 5 फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले. तसेच अन्य पुरस्कारांप्रमाणेच सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक व पटकथा संवाद लेखक म्हणून त्यांना गौरवले गेले.
1999 मध्ये सुरज बडजात्यांनी कथा, संवाद आणि दिग्दर्शित केलेला ‘हम साथ साथ है’ या राजश्री प्रौडक्शनच्या चित्रपटाने देखील अनेक विक्रम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा तिसरा चित्रपट कौटुंबिक चित्रपट म्हणून गाजला. 2006 मध्ये ‘विवाह’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर गाजला. या चित्रपटाने देशात 25 ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा केला.
‘प्रेम रतन धन पायो’ हा 2015 मधील प्रदर्शित झालेला आणि सुरज बडजात्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर हाऊसफूल होत राहिला. या चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या आणि अभिनेता सलमान खान 18 वर्षानंतर एकत्र आले होते. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ही याची ख्याती बनली.
कौटुंबिक आणि चांगले संस्कार करणार्‍या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुरज बडजात्यांनी नावलौकिक मिळवला. साधेे, खुसखूशीत निखळ मनोरंजन करणार्‍या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात सुरज बडजात्या नेहमी आघाडीवर राहिलेत. कुशाग्र बुद्धीमत्ता, परिस्थितीचे भान आणि कुटुंबसंस्था बळकट होण्यासाठी संस्कारित दृष्टीकोन देणारे सुरज बडजात्या हे हिंदी चित्रपट सृष्टीला मिळालेले मौलिक रत्नच आहेत.
कळावे

INIFD Deccan organizes Diwali Exhibition 2018

Pune, October 2018: Let us welcome Diwali, the festival of lights with creativity and enthusiasm by encouraging young generations this year.

For the first time ever, INIFD Deccan presents an exciting and exhilarating “Diwali Exhibition-2018” where they will be showcasing their

students’ creativity and hard work.

Diwali Exhibition 2018 will offer you the experience coupled with music, food stalls and showcasing some of the amazing work done with the

students of INIFD Deccan.

Come and experience two full days of the ultimate fun, perfect vibes and celebrate this Diwali under one roof with INIFD Deccan.

WHEN: October 21 & 22, 2018

WHERE: Raja Ravi Varma Art Gallery, Pune

Timings: 10 AM to 8 PM

DUSSEHRA BAZAAR at Amanora Mall

Pune, 15 Oct 2018: This festive period enhance your festive shopping with Dussehra Bazaar organised by Amanora Mall. From lip smacking delicacies, a whole new range of Handcrafted as well as modern latest Designer products to fun activities, Amanora Mall is the perfect destination to be at this Dussehra.

Dussehra Bazaar will be a unique blend of Handcrafted as well as modern latest Designer products. Explore Handcrafted Sarees, Dress Material, Jewellery, Home decor and latest Designer Wear available at your favourite shopping mall.

Food counters like Ladoos, Jalebi n Fafda and many more

Activities : Diya Making ,Toran making

WHEN : 19– 21ST Oct

VENUE : Amanora Mall

TIME : 11 am to 10 pm

१३-१०-१८

रंगांची उधळण आणि किलबिलाटात
महिला महोत्सवात चित्रकला स्पर्धा संपन्न
१९ व्या पुणे नवरात्र महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात आज लहान मुला मुलींच्या प्रतिभेचे दर्शन चित्रकला स्पर्धेतून झाले. सुमारे ५०० हून अधिक विविध वयोगटातील या मुला मुलींनी २ तासात सुंदर चित्रे रेखाटत त्यात रंग भरले आणि या स्पर्धेतही रंगत आणली. या स्पर्धेसाठी इयत्ता १ ली ते ३ री तील विद्यार्थ्यांसाठी दिलेले छापील चित्र रंगवणे, इयत्ता ४ थी ते ६ वीतील विद्यार्थ्यांसाठी पतंग उडविणारी मुले, पावसातील मजा आणि इयत्ता सातवी ते नववी साठी आवडता सण, खेळणी विक्रेता, शेतात काम करणारे शेतकरी असे विषय देण्यात आले होते. मुलामुलींच्या किलबिलाटात चित्रे रंगून झाल्यावर पुणे मनपाचे चित्रकला शिक्षक प्रकाश उघडे, नंदू मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. या तीन गटातील विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ ६ अशी बक्षिसे देण्यात आली.
इयत्ता पहिली ते तिसरी या गटात कु. हित बागरेचा, इयत्ता ४ थी ते ६ वी गटात कु .इशा वाघ व इयत्ता ७ वी ते ९ वी गटात कु. गौरी चंदनशिवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता पहिली ते तिसरी वयोगटात पहिल्या ३ क्रमांकांना अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल, घड्याळ आणि स्कूलबँग देण्यात आल्या. इयत्ता ४ ते ६ वी व ७ वी ते ९ वी या वयोगटात प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये देण्यात आले. जेष्ठ वास्तू विशारद महेश नांगपुरकर व सौ. उमा नांगपुरकर तसेच पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या नंतर सर्व स्पर्धक लहान मुला-मुलींना अल्पोपहार ज्यूस कंटेनर आणि खाऊ देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता बागुल, प्राजक्ता ढवळे, वृषाली बागुल यांनी विशेष काम केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक शारदा कनस्ट्रकशनचे गजानन माने, हेमंत बागुल होते.

फोटो ओळ : पुणे नवरात्रौ महोत्सवात बाल चित्रकार चित्रे रंगवण्यात दंग झालीत.

पुणे नवरात्रौ महोत्सव

किंग घडवणाऱ्या दिग्दर्शकांना
सांगितीक सलामी

‘किंगमेकर्स’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद.

पुणे : जुन्या काळातील दिग्गज दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधून संबंधित कलाकारांकडून, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय मिळेल असे काम करवून घेतले, ते कलाकार पुढे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘किंग’ बनले अशा दिग्दर्शकांची ओळख हिंदी गाण्यांच्या ‘किंगमेकर्स’ ऑर्केस्ट्रातून रसिकांना करुन देण्यात आली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाची तिसरी ‘माळ’ ऑर्केस्ट्रातील बहारदार हिंदी गाण्यांनी गुंफण्यात आली. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सूर-पालवी प्रस्तुत, संजय हिवराळे आणि पल्लवी पत्की-ढोले निर्मित कार्यक्रमात एस.यू.सनी, के.असिफ, बिमल रॉय, सुबोध मुखर्जी, बासू भट्टाचार्य, राजकपूर, गुरुदत्त, विजय आनंद, ज्योती स्वरुप, ऋषिकेश मुखर्जी, नासिर हुसेन, लेख टंडन, शक्ती सामंता, फिरोज खान, प्रकाश मेहरा, बी.आर.चोप्रा, जे.ओमप्रकाश, राज खोसला, रमेश सिप्पी, जे.पी.दत्ता या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधील गाणी पल्लवी, अभिषेक, संतोष, इरफान या गायकांनी सादर केली. अवीट गोडीच्या या गाण्यांना प्रेक्षकांमधून वन्समोअरची दाद वारंवार मिळत होती. जुन्या पिढीतील श्रोत्यांना त्यांच्या तरुणपणातील हळुवार आठवणींना त्या गाण्यांद्वारे उजाळा मिळाला. ‘मुकद्दर का सिकंदर’ या गाजलेल्या सिनेमातील ‘सलामे इश्क मेरी जान’ हे गाणे पल्लवी आणि संतोष यांनी सादर केले. त्या गाण्याला वन्समोअर मिळाले., तेव्हा या गाण्याला पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष ,नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल साथ करणार असतील तर वन्समोअर घेण्याची तयारी पल्लवी या गायिकेने दाखविली. तिच्या आवाहनाला दाद देत आबा बागुल यांनी तिच्याबरोबर गाणे सादर केले. रसिकांकडून आबा बागुलांच्या या कलाविष्काराला जोरदार दाद मिळाली. सर्वच उपस्थितांना आबा बागुलांमधील ही गायनी कला पाहून कौतुक वाटले. या कार्यक्रमात आबा बागुल यांचे बंधू राजेंद्र बागुल यांनी मुसाफिर हूँ यारों हे गीत सादर केले.

सध्या गाजत असलेल्या कुंकू, टिकली, टॅटू मालिकेतील टॅटूची भूमिका साकारत असलेली कलाकार भाग्यश्री न्हावले ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिचा सत्कार ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि नवरात्रौ महिला महोत्सवच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत, हर्षदा बागुल उपस्थित होते.

गायकांना मिहीर भडकमकर, अमृता केदार, रोहित साने, अंकुश बोर्डे, विनोद सोनावणे, शाम, सचिन वाघमारे, विजू मूर्ती, महेश रिसोडकर या वादक कलाकारांनी साथ दिली. निलम, चैत्राली, रिया यांनी कोरसची साथ केली.

निकोप सहकार्याची जागा अजून द्वेषपूर्ण स्पर्धेने घेतली नव्हती. सर्वच कलाकार एकमेकांना मदत करायला कायमच तयार असायचे त्या काळातील हे दिग्दर्शक. त्यांची वैशिष्ट्ये सांगत, खुमासदार किस्से सांगत महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी संयोजन समितीच्यावतीने आभार मानले. यावेळी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारे, हेमंत बागुल उपस्थित होते

फोटो ओळ :

१- शुक्रवारी पुणे नवरात्रौ महोत्सवात अभिनेत्री भाग्यश्री न्हावले हिचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत, माजी आमदार उल्हासदादा पवार, नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल.

२- गणेश कला क्रीडा रंगमंचावर पुणे नवरात्रौ महोत्सवात शुक्रवारी किंगमेकर्स ऑर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रम सादर करताना कलाकार.

पुणे नवरात्रौ महोत्सवात
‘महर्षी’ पुरस्काराचे पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम मानकरी
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ कायदेतज्ञ पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना दिला जाणार आहे.

‘महर्षी’ पुरस्कार वितरणाचा हा भव्य सोहळा बुधवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल.

फिनोलेक्स उद्योग समुहाच्या संचालिका श्रीमती रितु छाब्रिया यांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न होणार असून अध्यक्षस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार भूषविणार आहेत.

ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती याप्रसंगी असणार आहे.

तसेच माजी आमदार मोहन जोशी व ज्येष्ठ वास्तु विशारद महेश नामपूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

श्री लक्ष्मी मातेची चांदीची मुर्ती असणारे सन्मानचिह्न, मानपत्र, पुणेरी पगडी, सन्मानचिह्न, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी सौ. ज्योती उज्ज्वल निकम यांना देखील साडी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले जाईल.

अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष, नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.

आबा बागुल यांनी सांगितले की, हा प्रतिष्ठेचा ‘महर्षी’ पुरस्कार यापूर्वी 21 व्यक्तींना दिला गेला असून त्यामध्ये भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, डॉ. शोभना रानडे, चंदू बोर्डे, गोपाळराव पटवर्धन, डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. विजय भटकर, डॉ. विनोद शहा, भाई वैद्य, डॉ. मोहन धारिया, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. एम.एन.एस. मोदी, बी.आर. खेडकर, डॉ. प्र.ल. गावडे, लीला पूनावाला, सुर्यकांत पाठक, किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, पद्मश्री प्रतापराव पवार, डॉ. श्रीराम लागू यांचा समावेश आहे.

अशा पुरस्कारांमुळे समाजात उत्तम काम करणार्‍यांचा सन्मान तर होतोच शिवाय अनेकांना त्यापासून प्रेरणा देखील मिळते असे आबा बागुल म्हणाले.

पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या अजोड युक्तीवादामुळे अनेक खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्या व सामान्य लोकांना न्याय मिळाला.

जळगाव येथे सरकारी वकिल म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पाहिले.

त्यातील अनेक खटले देशभर गाजले.

मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांचे काम पाहिले.

सन 2010 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
1991 मध्ये कल्याण लोकल रेल्वे मधील बॉम्बस्फोट खटला, 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार येथील बॉम्बस्फोट खटला, 2003 मधील गुलशनकुमार खून खटला, 2004चा लंडनचा नदिम प्रत्यार्पण खटला, 2006चा खैरलांजी दलित हत्याकांड खटला, 2006 चा कुविख्यात गुन्हेगार अबू सालेम खटला, 2006चा भाजप नेते प्रमोद महाजन खून खटला, 26 नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा खटला, कोल्हापूरचा बाल हत्याकांड खटला, 2010 चा शक्तीमिल सामुहिक बलात्कार खटला, पुण्यातील राठी खून खटला, 2016 चा डेवीड हेडली खटला अशा अनेक महत्वपूर्ण खटल्यांमध्ये अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिल म्हणून काम बघून आरोपींना शिक्षा करण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवात त्यांना ‘महर्षी’ पुरस्काराने गौरवले जाणार आहे असे आबा बागुल यांनी सांगितले.
कळावे.

श्री समेद शिखरजी बचाओ अभियान
दि. 15 ऑक्टोबर रोजी जैन समाजाचा पुण्यात भव्य मोर्चा
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र धार्मिकस्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजी आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरूद्ध संपूर्ण देशातील जैन धर्मियांनी ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान सुरू केले आहे. श्री समेद शिखरजी जैन धर्मियांचे पूजाक्षेत्र (Place of Worship) म्हणून अधिकृत रित्या घोषीत करावे. व येथे पर्यटन विकास करू नये. या मागणीसाठी पुण्यातील सर्व जैन धर्मियांतर्फे ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान अंतर्गत सोमवार दि. 15 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता ओसवाल बंधू समाज कार्यालय, सेवन लव्हज् चौक येथून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन समाजाचा हा शांततामय विराट मोर्चा तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचेल व जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भातील पुण्यातील जैन समाजातर्फे निवेदन दिले जाईल. यामध्ये जैन धर्मियांचे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि तेरापंथी अशा सर्व उपपंथांचे जैन बंधू भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
पूर्वी बिहार आणि आता झारखंड राज्यात असणार्‍या जैन धर्मियांच्या श्री समेद शिखरजी या पवित्र धर्मस्थळी 24 पैकी 20 तीर्थंकारांनी निर्वाण केले असून कोट्यावधी जैन मुनींनी तेथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला आहे. केवळ देशातीलच नव्हे तर जगातील जैन भावीक आयुष्यात एकदा तरी श्री समेद शिखरजी येथे जातोच. एकूण 27 किमीची पहाडावरील मार्गक्रमणा प्रत्येक जैन भाविक अनवाणी करत असतो. मोगल आणि ब्रिटीश राजवटीतही श्री समेद शिखरजी बाबत जैन धर्मियांच्या असणार्‍या भावनांचा आदर केला गेला. मात्र आता झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सारा जैन समाज प्रक्षुब्ध झाला आहे.
श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकास करण्याच्या घोषणेमुळे तेथे रिसॉर्ट, परमिटरूम, मांसाहारी खाद्यपदार्थ मिळण्याची सोय होऊन पर्यटनास कदाचित चालना मिळेलही मात्र शतकानुशतके जैन धर्मियांच्या दृष्टीने पवित्र स्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजीचे पावित्र्य भंग पावेल हे निश्चित.
‘श्री समेद शिखरजी’वर श्रद्धा असणार्‍या अहिंसा, करूना, मानवता या उदात्त मुल्यांचा जय घोष करणार्‍या जैन समाजाने देश सेवा व लोकसेवेत नेहमीच मोठी मदत केली आहे.
झारखंड सरकारने श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकासाबाबत केलेली योजना मागे घ्यावी. व श्री समेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र पूजास्थळ (Place of Worship) म्हणून घोषीत करावे अशी मागणी संपूर्ण जैन समाज करीत आहे. पुण्यातील मोर्चाचे प्रयोजन हेच आहे.
कळावे.