उद्योगमहर्षी रसिकलाल धारीवाल आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या
पहिल्या ‘पुलकभूषण’ पुरस्काराचे मानकरी
दि. 21 ऑक्टोबर रोजी भव्य प्रदान समारंभ

दानशुर उद्योगमहर्षी रसिकलाल एम.धारीवाल आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना यंदाचा पहिला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील ‘पुलकभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी सायं. 4 वाजता दिगंबर जैन मुनिश्री प.पु. 108 पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वे नगर, पुणे येथे समारंभपूर्वक दिला जाणार आहे. चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याअध्यक्ष मिलिंद फडे व उपाध्यक्ष चकोर गांधी यांनी दिली . या प्रसंगी समितीचे सचीव जितेंद्र शहा आणि सहचिटणीस संजय नाईक उपस्थित होते .
राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, शाकाहार-अहिंसा या मानवी मुल्यांशी असणारी वैचारिक बांधिलकी, समाजात सातत्याने पायाभूत व दिशादर्शक काम, समाजातील दुर्बल घटकांना शैक्षणिक व वैद्यकीय साहाय्य देण्यासाठी संस्था व सुविधांची उभारणी अशा विविध निकषांवर आधारित दरवर्षी दोन स्त्री अथवा पुरूष व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणताही धर्म, प्रांत, भाषा, लिंग याचा भेद न करता हा पुरस्कार दरवर्षी घोषित होऊन मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या दरवर्षी होणार्‍या चातुर्मास स्थळी या पुरस्काराचे वितरण केले जाईल.
रसिकलाल एम. धारीवाल – केवळ जैनच नव्हे तर सर्वच धर्मियांमध्ये आस्था बाळगणारे दानशुर उद्योगमहर्षी हा नावलौकिक मिळवलेले रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धर्मसंस्कार अशा विविध क्षेत्रात सातत्याने महत्वाचे योगदान दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे त्यांचा जन्म
1 मार्च 1939 ला झाला. वडिल माणिकचंद यांच्या अकाली निधनानंतर मातोश्री श्रीमती मदनबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खडतर जीवन प्रवास सुरू केला. मात्र उद्यमशीलता, कर्तबगारी, जिद्द, दूरदृष्टी आणि धार्मिक संस्कार या पंचसूत्रीच्या आधारे त्यांनी सर्वच क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी उभारलेल्या माणिकचंद उद्योग समुहाने देशात मानाचे स्थान मिळविले आहे. पानमसाला, तंबाखू उत्पादने, माउथ फ्रेशनर, इलेक्ट्रिकल स्विचेस, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेग्जिबल पॅकिंग, बांधकाम व्यवसाय, पवनचक्या, ऑक्सिरिच मिनरल वॉटर, चहा आणि काडेपेटी अशा महत्वपूर्ण क्षेत्रात त्यांच्या सर्व उत्पादनांनी केवळ दबदबा निर्माण केला असे नाही तर गुणवत्तेवर सदैव भर देऊन त्यांनी सर्व उत्पादने सदैव अग्रेसर ठेवली. त्यांचा व्यवसाय पुणे, दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, बडोदा आणि आसाम येथे विस्तारला आहे. देशामध्ये अनेक उत्पादनांची त्यांचे वितरक म्हणून मोठी वितरण व्यवस्था त्यांनी उभारली. त्यांची अनेक उत्पादने 50 हून अधिक देशात निर्यात होतात. ‘उंचे लोग-उंची पसंद’ हे त्यांचे ब्रँड नेम सर्वत्र लोकप्रिय झाले.
उद्योग महर्षी रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योगाप्रमाणेच सामाजिक जबाबदारीची जाण ठेऊन अनेक समाजोपयोगी उपक्रम उभे केले. तसेच समाजासाठी चांगले काम करणार्‍या संस्थांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले. शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कायमस्वरूपी समाजोपयोगी कामे उभारतानाच भूकंप, पूर अशा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्यावेळी देखील माणिकचंद उद्योगसमूह मदत करण्यासाठी सदैव पुढे सरसावला. लाखो गरजू, तरूण नागरिकांच्या चेहर्‍यावरील हास्य व समाधान हेच उद्योगसमूहाचे यश असे ते मानत राहिले.
शैक्षणिक पातळीवर त्यांनी अनेक संस्था उभारल्या तसेच हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळण्याची व्यवस्था केली. शिरूर, पुणे येथे अनेक महत्वपूर्ण शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याचबरोबर पुण्यात मुलींचे वसतीगृह, चांदवड (नाशिक) व तळेगाव येथे मुलांचे वसतीगृह उभारून त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी सोय केली. त्याचप्रमाणे शिरूर, पावापुरी (बिहार), चिंचवड, गणेगाव, उदयपूर, अलिगड, पुणे, उज्जैन, वैजापूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या शिक्षण संस्थांचे देखील माणिकचंद उद्योगसमूह आधारस्तंभ आहेत. गरजू विद्यार्थ्यांना चांगली शिष्यवृत्ती देता यावी यासाठी त्यांनी आठ कोटी रुपयांचा ट्रस्ट निर्माण केला.
वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभारले. माणिकचंद उद्योग समुहाने गरीब रुग्णांसाठी माफक दरात अथवा निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यासाठी अद्ययावत इस्पितळांची निर्मिती केली. तसेच देशातील अनेक इस्पितळांना मोठा आर्थिक सहयोग दिला. त्यातूनच पुण्यात नर्सिंग कॉलेज व होस्टेलही सुरू झाले. पुणे, नगर, औरंगाबाद, अलिगड, पालिठाणा अशा अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली हॉस्पिटल्स् अद्ययावत करण्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले.
सामाजिक पातळीवर लातूर व गुजरातचा भूकंप,आंध्रमधील वादळ, कारगिल युद्ध अशा प्रत्येक वेळी माणिकचंद उद्योगसमूह मदतीसाठी पुढे सरसावला. अलिगड व पानशेत येथे वृद्धाश्रमही उभारलेले.
धार्मिक पातळीवर, पालिठाना येथील शत्रूंजय तिर्थ, शिखरजी येथे धर्मशाळा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील धार्मिक स्थळांना आर्थिक सहाय्य करून त्यांनी मोठे योगदान दिले.
सुरज बडजात्या – 22 फेब्रुवारी 1965 मध्ये जन्मलेले सुरज बडजात्या यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट सृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांचा ‘सारांश’, दिग्दर्शक हिरेंद्र नाग यांचा ‘अबोद’, टिव्ही सिरीयल ‘पेईंग गेस्ट’ आणि दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’ यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले. याच काळात लेखक व दिग्दर्शक म्हणून ही ते नावारूपास आले. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘मै प्रेम की दिवानी हूँ’, ‘विवाह’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनात त्यांनी आपल्यातील गुणांची चमक दाखवली. राजश्री प्रोडक्शन समवेत त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्ये प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून काम केले.
1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. एवढेच नव्हे तर गेल्या 70 वर्षातील देशातील 10 यशस्वी चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. या चित्रपटामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1994 मध्ये राजश्री प्रोडक्शनचा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने केवळ रौप्य महोत्सवच साजरा केला असे नाही तर देशातील पहिल्या 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. या चित्रपटाने तब्बल 5 फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले. तसेच अन्य पुरस्कारांप्रमाणेच सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक व पटकथा संवाद लेखक म्हणून त्यांना गौरवले गेले.
1999 मध्ये सुरज बडजात्यांनी कथा, संवाद आणि दिग्दर्शित केलेला ‘हम साथ साथ है’ या राजश्री प्रौडक्शनच्या चित्रपटाने देखील अनेक विक्रम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा तिसरा चित्रपट कौटुंबिक चित्रपट म्हणून गाजला. 2006 मध्ये ‘विवाह’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर गाजला. या चित्रपटाने देशात 25 ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा केला.
‘प्रेम रतन धन पायो’ हा 2015 मधील प्रदर्शित झालेला आणि सुरज बडजात्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर हाऊसफूल होत राहिला. या चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या आणि अभिनेता सलमान खान 18 वर्षानंतर एकत्र आले होते. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ही याची ख्याती बनली.
कौटुंबिक आणि चांगले संस्कार करणार्‍या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुरज बडजात्यांनी नावलौकिक मिळवला. साधेे, खुसखूशीत निखळ मनोरंजन करणार्‍या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात सुरज बडजात्या नेहमी आघाडीवर राहिलेत. कुशाग्र बुद्धीमत्ता, परिस्थितीचे भान आणि कुटुंबसंस्था बळकट होण्यासाठी संस्कारित दृष्टीकोन देणारे सुरज बडजात्या हे हिंदी चित्रपट सृष्टीला मिळालेले मौलिक रत्नच आहेत.
कळावे

INIFD Deccan organizes Diwali Exhibition 2018

Pune, October 2018: Let us welcome Diwali, the festival of lights with creativity and enthusiasm by encouraging young generations this year.

For the first time ever, INIFD Deccan presents an exciting and exhilarating “Diwali Exhibition-2018” where they will be showcasing their

students’ creativity and hard work.

Diwali Exhibition 2018 will offer you the experience coupled with music, food stalls and showcasing some of the amazing work done with the

students of INIFD Deccan.

Come and experience two full days of the ultimate fun, perfect vibes and celebrate this Diwali under one roof with INIFD Deccan.

WHEN: October 21 & 22, 2018

WHERE: Raja Ravi Varma Art Gallery, Pune

Timings: 10 AM to 8 PM

DUSSEHRA BAZAAR at Amanora Mall

Pune, 15 Oct 2018: This festive period enhance your festive shopping with Dussehra Bazaar organised by Amanora Mall. From lip smacking delicacies, a whole new range of Handcrafted as well as modern latest Designer products to fun activities, Amanora Mall is the perfect destination to be at this Dussehra.

Dussehra Bazaar will be a unique blend of Handcrafted as well as modern latest Designer products. Explore Handcrafted Sarees, Dress Material, Jewellery, Home decor and latest Designer Wear available at your favourite shopping mall.

Food counters like Ladoos, Jalebi n Fafda and many more

Activities : Diya Making ,Toran making

WHEN : 19– 21ST Oct

VENUE : Amanora Mall

TIME : 11 am to 10 pm

१३-१०-१८

रंगांची उधळण आणि किलबिलाटात
महिला महोत्सवात चित्रकला स्पर्धा संपन्न
१९ व्या पुणे नवरात्र महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात आज लहान मुला मुलींच्या प्रतिभेचे दर्शन चित्रकला स्पर्धेतून झाले. सुमारे ५०० हून अधिक विविध वयोगटातील या मुला मुलींनी २ तासात सुंदर चित्रे रेखाटत त्यात रंग भरले आणि या स्पर्धेतही रंगत आणली. या स्पर्धेसाठी इयत्ता १ ली ते ३ री तील विद्यार्थ्यांसाठी दिलेले छापील चित्र रंगवणे, इयत्ता ४ थी ते ६ वीतील विद्यार्थ्यांसाठी पतंग उडविणारी मुले, पावसातील मजा आणि इयत्ता सातवी ते नववी साठी आवडता सण, खेळणी विक्रेता, शेतात काम करणारे शेतकरी असे विषय देण्यात आले होते. मुलामुलींच्या किलबिलाटात चित्रे रंगून झाल्यावर पुणे मनपाचे चित्रकला शिक्षक प्रकाश उघडे, नंदू मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. या तीन गटातील विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ ६ अशी बक्षिसे देण्यात आली.
इयत्ता पहिली ते तिसरी या गटात कु. हित बागरेचा, इयत्ता ४ थी ते ६ वी गटात कु .इशा वाघ व इयत्ता ७ वी ते ९ वी गटात कु. गौरी चंदनशिवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता पहिली ते तिसरी वयोगटात पहिल्या ३ क्रमांकांना अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल, घड्याळ आणि स्कूलबँग देण्यात आल्या. इयत्ता ४ ते ६ वी व ७ वी ते ९ वी या वयोगटात प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये देण्यात आले. जेष्ठ वास्तू विशारद महेश नांगपुरकर व सौ. उमा नांगपुरकर तसेच पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या नंतर सर्व स्पर्धक लहान मुला-मुलींना अल्पोपहार ज्यूस कंटेनर आणि खाऊ देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता बागुल, प्राजक्ता ढवळे, वृषाली बागुल यांनी विशेष काम केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक शारदा कनस्ट्रकशनचे गजानन माने, हेमंत बागुल होते.

फोटो ओळ : पुणे नवरात्रौ महोत्सवात बाल चित्रकार चित्रे रंगवण्यात दंग झालीत.

पुणे नवरात्रौ महोत्सव

किंग घडवणाऱ्या दिग्दर्शकांना
सांगितीक सलामी

‘किंगमेकर्स’ कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद.

पुणे : जुन्या काळातील दिग्गज दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांमधून संबंधित कलाकारांकडून, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय मिळेल असे काम करवून घेतले, ते कलाकार पुढे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘किंग’ बनले अशा दिग्दर्शकांची ओळख हिंदी गाण्यांच्या ‘किंगमेकर्स’ ऑर्केस्ट्रातून रसिकांना करुन देण्यात आली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाची तिसरी ‘माळ’ ऑर्केस्ट्रातील बहारदार हिंदी गाण्यांनी गुंफण्यात आली. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सूर-पालवी प्रस्तुत, संजय हिवराळे आणि पल्लवी पत्की-ढोले निर्मित कार्यक्रमात एस.यू.सनी, के.असिफ, बिमल रॉय, सुबोध मुखर्जी, बासू भट्टाचार्य, राजकपूर, गुरुदत्त, विजय आनंद, ज्योती स्वरुप, ऋषिकेश मुखर्जी, नासिर हुसेन, लेख टंडन, शक्ती सामंता, फिरोज खान, प्रकाश मेहरा, बी.आर.चोप्रा, जे.ओमप्रकाश, राज खोसला, रमेश सिप्पी, जे.पी.दत्ता या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधील गाणी पल्लवी, अभिषेक, संतोष, इरफान या गायकांनी सादर केली. अवीट गोडीच्या या गाण्यांना प्रेक्षकांमधून वन्समोअरची दाद वारंवार मिळत होती. जुन्या पिढीतील श्रोत्यांना त्यांच्या तरुणपणातील हळुवार आठवणींना त्या गाण्यांद्वारे उजाळा मिळाला. ‘मुकद्दर का सिकंदर’ या गाजलेल्या सिनेमातील ‘सलामे इश्क मेरी जान’ हे गाणे पल्लवी आणि संतोष यांनी सादर केले. त्या गाण्याला वन्समोअर मिळाले., तेव्हा या गाण्याला पुणे नवरात्र महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष ,नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल साथ करणार असतील तर वन्समोअर घेण्याची तयारी पल्लवी या गायिकेने दाखविली. तिच्या आवाहनाला दाद देत आबा बागुल यांनी तिच्याबरोबर गाणे सादर केले. रसिकांकडून आबा बागुलांच्या या कलाविष्काराला जोरदार दाद मिळाली. सर्वच उपस्थितांना आबा बागुलांमधील ही गायनी कला पाहून कौतुक वाटले. या कार्यक्रमात आबा बागुल यांचे बंधू राजेंद्र बागुल यांनी मुसाफिर हूँ यारों हे गीत सादर केले.

सध्या गाजत असलेल्या कुंकू, टिकली, टॅटू मालिकेतील टॅटूची भूमिका साकारत असलेली कलाकार भाग्यश्री न्हावले ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिचा सत्कार ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि नवरात्रौ महिला महोत्सवच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत, हर्षदा बागुल उपस्थित होते.

गायकांना मिहीर भडकमकर, अमृता केदार, रोहित साने, अंकुश बोर्डे, विनोद सोनावणे, शाम, सचिन वाघमारे, विजू मूर्ती, महेश रिसोडकर या वादक कलाकारांनी साथ दिली. निलम, चैत्राली, रिया यांनी कोरसची साथ केली.

निकोप सहकार्याची जागा अजून द्वेषपूर्ण स्पर्धेने घेतली नव्हती. सर्वच कलाकार एकमेकांना मदत करायला कायमच तयार असायचे त्या काळातील हे दिग्दर्शक. त्यांची वैशिष्ट्ये सांगत, खुमासदार किस्से सांगत महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी संयोजन समितीच्यावतीने आभार मानले. यावेळी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारे, हेमंत बागुल उपस्थित होते

फोटो ओळ :

१- शुक्रवारी पुणे नवरात्रौ महोत्सवात अभिनेत्री भाग्यश्री न्हावले हिचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लडकत, माजी आमदार उल्हासदादा पवार, नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल.

२- गणेश कला क्रीडा रंगमंचावर पुणे नवरात्रौ महोत्सवात शुक्रवारी किंगमेकर्स ऑर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रम सादर करताना कलाकार.

पुणे नवरात्रौ महोत्सवात
‘महर्षी’ पुरस्काराचे पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम मानकरी
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ कायदेतज्ञ पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना दिला जाणार आहे.

‘महर्षी’ पुरस्कार वितरणाचा हा भव्य सोहळा बुधवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल.

फिनोलेक्स उद्योग समुहाच्या संचालिका श्रीमती रितु छाब्रिया यांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न होणार असून अध्यक्षस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार भूषविणार आहेत.

ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती याप्रसंगी असणार आहे.

तसेच माजी आमदार मोहन जोशी व ज्येष्ठ वास्तु विशारद महेश नामपूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

श्री लक्ष्मी मातेची चांदीची मुर्ती असणारे सन्मानचिह्न, मानपत्र, पुणेरी पगडी, सन्मानचिह्न, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी सौ. ज्योती उज्ज्वल निकम यांना देखील साडी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले जाईल.

अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष, नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.

आबा बागुल यांनी सांगितले की, हा प्रतिष्ठेचा ‘महर्षी’ पुरस्कार यापूर्वी 21 व्यक्तींना दिला गेला असून त्यामध्ये भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर, डॉ. शोभना रानडे, चंदू बोर्डे, गोपाळराव पटवर्धन, डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. विजय भटकर, डॉ. विनोद शहा, भाई वैद्य, डॉ. मोहन धारिया, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. एम.एन.एस. मोदी, बी.आर. खेडकर, डॉ. प्र.ल. गावडे, लीला पूनावाला, सुर्यकांत पाठक, किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, पद्मश्री प्रतापराव पवार, डॉ. श्रीराम लागू यांचा समावेश आहे.

अशा पुरस्कारांमुळे समाजात उत्तम काम करणार्‍यांचा सन्मान तर होतोच शिवाय अनेकांना त्यापासून प्रेरणा देखील मिळते असे आबा बागुल म्हणाले.

पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या अजोड युक्तीवादामुळे अनेक खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्या व सामान्य लोकांना न्याय मिळाला.

जळगाव येथे सरकारी वकिल म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पाहिले.

त्यातील अनेक खटले देशभर गाजले.

मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांचे काम पाहिले.

सन 2010 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
1991 मध्ये कल्याण लोकल रेल्वे मधील बॉम्बस्फोट खटला, 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार येथील बॉम्बस्फोट खटला, 2003 मधील गुलशनकुमार खून खटला, 2004चा लंडनचा नदिम प्रत्यार्पण खटला, 2006चा खैरलांजी दलित हत्याकांड खटला, 2006 चा कुविख्यात गुन्हेगार अबू सालेम खटला, 2006चा भाजप नेते प्रमोद महाजन खून खटला, 26 नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा खटला, कोल्हापूरचा बाल हत्याकांड खटला, 2010 चा शक्तीमिल सामुहिक बलात्कार खटला, पुण्यातील राठी खून खटला, 2016 चा डेवीड हेडली खटला अशा अनेक महत्वपूर्ण खटल्यांमध्ये अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिल म्हणून काम बघून आरोपींना शिक्षा करण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवात त्यांना ‘महर्षी’ पुरस्काराने गौरवले जाणार आहे असे आबा बागुल यांनी सांगितले.
कळावे.

श्री समेद शिखरजी बचाओ अभियान
दि. 15 ऑक्टोबर रोजी जैन समाजाचा पुण्यात भव्य मोर्चा
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र धार्मिकस्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजी आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरूद्ध संपूर्ण देशातील जैन धर्मियांनी ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान सुरू केले आहे. श्री समेद शिखरजी जैन धर्मियांचे पूजाक्षेत्र (Place of Worship) म्हणून अधिकृत रित्या घोषीत करावे. व येथे पर्यटन विकास करू नये. या मागणीसाठी पुण्यातील सर्व जैन धर्मियांतर्फे ‘श्री समेद शिखरजी’ बचाओ अभियान अंतर्गत सोमवार दि. 15 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9 वाजता ओसवाल बंधू समाज कार्यालय, सेवन लव्हज् चौक येथून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. जैन समाजाचा हा शांततामय विराट मोर्चा तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचेल व जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भातील पुण्यातील जैन समाजातर्फे निवेदन दिले जाईल. यामध्ये जैन धर्मियांचे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी आणि तेरापंथी अशा सर्व उपपंथांचे जैन बंधू भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
पूर्वी बिहार आणि आता झारखंड राज्यात असणार्‍या जैन धर्मियांच्या श्री समेद शिखरजी या पवित्र धर्मस्थळी 24 पैकी 20 तीर्थंकारांनी निर्वाण केले असून कोट्यावधी जैन मुनींनी तेथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला आहे. केवळ देशातीलच नव्हे तर जगातील जैन भावीक आयुष्यात एकदा तरी श्री समेद शिखरजी येथे जातोच. एकूण 27 किमीची पहाडावरील मार्गक्रमणा प्रत्येक जैन भाविक अनवाणी करत असतो. मोगल आणि ब्रिटीश राजवटीतही श्री समेद शिखरजी बाबत जैन धर्मियांच्या असणार्‍या भावनांचा आदर केला गेला. मात्र आता झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सारा जैन समाज प्रक्षुब्ध झाला आहे.
श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकास करण्याच्या घोषणेमुळे तेथे रिसॉर्ट, परमिटरूम, मांसाहारी खाद्यपदार्थ मिळण्याची सोय होऊन पर्यटनास कदाचित चालना मिळेलही मात्र शतकानुशतके जैन धर्मियांच्या दृष्टीने पवित्र स्थळ असणार्‍या श्री समेद शिखरजीचे पावित्र्य भंग पावेल हे निश्चित.
‘श्री समेद शिखरजी’वर श्रद्धा असणार्‍या अहिंसा, करूना, मानवता या उदात्त मुल्यांचा जय घोष करणार्‍या जैन समाजाने देश सेवा व लोकसेवेत नेहमीच मोठी मदत केली आहे.
झारखंड सरकारने श्री समेद शिखरजी येथे पर्यटन विकासाबाबत केलेली योजना मागे घ्यावी. व श्री समेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र पूजास्थळ (Place of Worship) म्हणून घोषीत करावे अशी मागणी संपूर्ण जैन समाज करीत आहे. पुण्यातील मोर्चाचे प्रयोजन हेच आहे.
कळावे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात
सहाशे लहान मुलींचे कन्या पूजन
19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज ललिता पंचमीच्या निमित्ताने इयत्ता 1 ली ते 4 थी मधील 600 हून अधिक मुलींचे कन्यापूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या या लहान मुलींनी डोक्यावर ‘जय माता दी’ च्या पट्ट्या बांधल्या होत्या. तसेच तांबडा, हिरवा व पिवळा अशा रंगातील पोशाख परिधान करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या तीन रंगातील पंजाबी ड्रेस, परकर पोलके वा पारंपरिक ड्रेस घालून आलेल्या या मुलींचे प्रथम पाय धुवून कुंकवाने त्यांच्या पायावर स्वस्तिक काढण्यात आले. यानंतर गुरूजींच्या मंत्रोचारात या मुलींना पारंपारिक पद्धतीने ओवाळले गेले. तसेच सामुहिक देवीची आरतीही करण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमावेळी शेकडो पालकांनी गर्दी केली होती. यानंतर सर्व मुलींना अल्पोपहार व खाऊ देण्यात आला. तसेच पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील विजेता मुली तसेच सहभागी प्रत्येक मुलीस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात छाया कातुरे, निर्मला जगताप, दीपा बागुल, हर्षदा बागुल, योगिता निकम, सोनम बागुल, नम्रता जगताप आदींनी विशेष प्रयत्न केले.

फोटो : Kanya Poojan
फोटो ओळ : पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘कन्यापूजन’ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी लहान मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना ओवाळण्यात आले. यावेळी फोटोमध्ये पुणे नवरात्रौ महिला मोहत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल मुलीस कुंकूमतिलक लावताना दिसत आहे.

गदिमांच्या स्मारकासाठी आबा बागुल यांची मदत मोलाची
श्रीधर माडगूळकरांनी व्यक्त केली अपेक्षा

नुकत्याच जन्मलेल्या बाळाची काहीच हालचाल नाही, रडणे नाही यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. पण एक प्रयत्न म्हणून सुईणीने या बाळाच्या नाभीपाशी चटका दिला त्याक्षणी ते बाळ माणसात आले, ते बाळ म्हणजेच पुढे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी हा किताब मिळालेले ग.दि. माडगूळकर हे प्रतिभासंपन्न कवी. त्यांची जन्मशताब्दी यंदा साजरी होत आहे. पण त्यामागे त्यांच्या जन्माच्या वेळची ही महत्त्वपूर्ण घटना कारण आहे. ही आठवण गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या कार्यक्रमात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांगितली.

पुणे नवरात्रौ महोत्सवात दुसऱ्या ‘माळेला’ ‘दैवी त्रिरत्ने’ हा गदिमा, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्या गीत आणि संगीताची सुंदर अनुभूती देणारा कार्यक्रम ‘स्वरानंद’ संस्थेने श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर केला. याप्रसंगी श्रीधर माडगूळकर सपत्नीक उपस्थित राहिले. महाराष्ट्रातील ग.दि.मा, बाबुजी, पु.ल यांच्या जन्मशताब्दीचे स्मरण ठेवून त्यांना पुणे नवरात्रौ महोत्सव समर्पित करण्यात आला आहे असे पुणे नवरात्रो महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष
नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले. यावेळी ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन श्रीधर माडगूळकर व आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीधर माडगूळकर यांनी समाधान व्यक्त केले. भीमसेन जोशी कलादालन आबा बागुलांनी अल्पावधीत पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून उभे करुन दाखविले. आबा बागुल आमदार असते तर गदिमांचे स्मारकही पूर्णत्वास गेले असते अशा भावना श्रीधर माडगूळकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्मारक प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरविले आहे. आबा तुमचे सहकार्य यास मिळावे त्यातून हा प्रकल्प तडीस जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना ग.दि.मां च्या जन्माच्या वेळची कहाणी श्रीधर माडगूळकर यांनी सांगितली. तसेच ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ गीत रामायणातील हे गीत पुणे आकाशवाणीच्या लाईव्ह कार्यक्रमाच्या काही तास अगोदर ग.दि.मां ना कसे सुचले आणि बाबुजींनी काही मिनिटे अगोदर त्या गीताला चाल कशी लावली त्याविषयीची या दोन महाकलावंतांच्या प्रतिभेची चुणूक दाखविणारी आठवणही सांगितली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन श्रीधर माडगूळकर आणि शिल्पकार विवेक खटावकर यांचा सत्कार करण्यात आला. सौ. माडगूळकर यांचा सत्कार निर्मला जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. स्वरानंद संस्थेच्या कलाकारांचा सत्कार श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे पदाधिकारी अमित बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी उपस्थित होते.

ग.दि.मा, बाबुजी आणि पु.ल यांच्या गीत, संगीताचा कार्यक्रम स्वरानंद संस्थेने सादर केला. संजय गंभीर यांच्या सुश्राव्य निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. उपस्थित श्रोत्यांनी गीतांना वन्समोअरची दाद दिली. कार्यक्रमात सत्य शिवाहून सुंदर हे, जिवलगा कधी रे येशील तू, संथ वाहते कृष्णामाई, ह्रदयी प्रीत जागते जाणता-अजाणता, अशी पाखरे येती, दैवजात दुःखे भरता, नाच रे मोरा, जाळीमंदी पिकली करवंद आदी गीते सादर केली. गीत रामायणीत काही गीतांचे मुखडे सादर केले. साने गुरुजींच्या ‘बलसागर भारत होवो’ या विश्वात्मक देवाकडे केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राजेंद्र उत्तुरकर यांनी बिगरी ते मॅट्रिक या पु.लं च्या कथाकथनातील काही भाग सादर केला.

स्वरानंदचे हेमंत वाळुंजकर, अभिजीत पंचभाई, श्रुती देवस्थळी या गायकांना पराग माटेगांवकर, अभय इंगळे, मिहीर भडकमकर आणि अभिजीत जायदे यांनी वादनाची साथ दिली.

फोटो : Pune Navratra Mahotsav News and Photo (1)
Pune Navratra Mahotsav News and Photo (2)

फोटो ओळ :

१) पुणे नवरात्रौ महोत्सवात गुरुवारी स्वरानंद संस्थेने दैवी त्रिरत्ने हा ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल. देशपांडे यांच्या विविध गीतांचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर केला.

२) पुणे नवरात्रौ महोत्सवात ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते गुरुवारी दैवी त्रिरत्ने कार्यक्रम प्रसंगी करण्यात आले. त्यावेळी सौ. माडगूळकर, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते.

Celebrate Indie Music with Vidya Vox, Benny Dayal, Nirmika Singh at the 8th Season of India Film Project

Mumbai 2018: India Film Project Season 08 welcomes the Popular Indo – Western mashup queen and American Singer Vidya Vox. Famous for her mashup of Major Lazer’s Lean On, Closer – Kabira and many more will be in conversation with the multi- talented vocalist Benny Dayal and India musician singer and lyricist Nirmika Singh to discuss about “How Indie Music is going to be a need for the next decade”.

Along with these music curators Nirali Kartik of fame Maati Bani and Sona Mohapatra will also be a part of the two day long festival talking about How to collaborate digitally and music year in a review respectively.

India Film Project is the Asia’s Largest Content Creation Festival and one of the largest creative collaborations in the world.

The 8th season of India Film Project aims to be the ultimate destination and platform for writers, storytellers, poets, composers, filmmakers, cinematographers and editors to let their creativity be recognized and thrive.

As the festival has promised to be bigger and better this year, 35,000 participants from over 20 countries and 300 cities have already created and submitted over 1700 short films; the highest participation the festival has seen in the last 8 years! With numerous efforts, India Film Project is now considered as one of the world’s largest conglomeration of content experts and aspiring creative content creators, giving people a chance to learn through each other’s tale