आपल्या मानसिकतेत आपण दडवून ठेवलेल्या जखमांवरील पट्ट्या ते आपल्या लेखनातून ओरबाडून काढत आणि त्या जखमेकडे म्हणजेच सत्याकडे पाहायला आपल्याला भाग पाडत. त्या अर्थाने कठीण विषयांवर लिहिताना मला तेंडुलकरांकडून प्रेरणा मिळते. ‘पिफ’ महोत्सवाचा या वर्षीचा विषय त्यांना फार आवडला असता.

-मी जाहिरात क्षेत्रात काम करत असताना अनपेक्षितपणे अमोल पालेकरांचा ‘अनकही’ चित्रपट लिहिण्याची संधी मिळाली. नंतर व्यावसायिक चित्रपट ‘जलवा’ लिहिला आणि अशा रितीने चित्रपट लेखनाचे सत्र सुरू झाले.

– कलात्मक किंवा समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद मी मानत नाही. लेखक म्हणून मला काहीही वर्ज्य नाही. अगदी सासू-सुनेची कथाही योग्य रितीने हाताळली तर चित्रपट लेखक म्हणून मला ती प्रतिगामी वाटत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आपण बघायला हवेत. मी चित्रपट लेखक आहे तसा प्रेक्षकही आहे. मला ‘उसकी रोटी’ आणि ‘आषाढ का एक दिन’ आवडतो, मी ‘शोले’ व ‘खलनायक’सारख्या व्यावसायिक चित्रपटांचाही आनंद घेऊ शकतो. या चित्रपटांचा प्रकार वेगवेगळा आहे.

– भारतीय चित्रपटांची कथा संगीताशिवाय पुढे जाऊ शकत नाही. केवळ संगीत कुठे वापरायचे ते माहिती हवे.

-चित्रपट लिहिताना माझ्या कथेतील भूमिका कितीही लहान-मोठ्या असल्या तरी मी त्यातील प्रत्येकाचे चरित्र माझ्यासमोर उभे करतो. अगदी त्या व्यक्तिरेखेच्या खिशात किती सुट्टे पैसे असतील इतकी ती भूमिका लेखकाला सखोल कळलेली हवी. एका क्षणी ती व्यक्तिरेखाच लेखकाशी बोलू लागते आणि त्या व्यक्तीसाठी लिहिलेले संवाद योग्य की योग्य याचा निर्णय देऊ लागते. ते चित्रपट लेखकाला मिळालेले बक्षीस असते. पटथालेखन ही ४-५ दिवसांच्या कार्यशाळेत शिकण्याची गोष्ट नव्हे.

-माझ्यासाठी चित्रपटाचा पटकथालेखक हा त्याचा पहिला ‘स्टार’ असतो. कारण लेखकाकडे येण्यापूर्वी चित्रपट हे केवळ एक कोरे पान असते. त्यामुळे लेखकाचे काम अवघड.

-‘रंग दे बसंती’च्या कथेस ६ वर्षे विविध निर्मात्यांकडून नकार मिळत होता. एका निर्मात्याने तर मला यात बसंतीची भूमिका कोण करणार असेही विचारले! अभिनेता आमिर खानला कथा ऐकवल्यावर तो काम करण्यास तयार झाला आणि त्याने संगीतकार ए. आर. रहमानला तयार केले. त्यानंतर आधी तीनदा हा चित्रपट नाकारलेली ‘यूटीव्ही’ कंपनी त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तयार झाली.

-मी लिहितो ते चित्रपट पाहून अगदी सायकल दुरुस्तीवाल्यालाही पैसे वसूल झाल्यासारखे वाटले पाहिजे असे मला वाटते. समीक्षकांना चित्रपट आवडला नाही किंवा मला बक्षीसे मिळाली नाहीत तरी मला त्याचे काही वाटत नाही.

-जे जीवन मी अनुभवलेले नसते त्याविषयी लिहिताना मी इतर साहित्यिकांच्या लेखनातून प्रेरणा घेतो. अगदी वर्तमानपत्रांमधील बातम्या व लेखांचाही त्यासाठी फायदा होतो.

Programs at PIFF Forum (Thurseday, 17th January, 2019)

-11.00pm onwards- Candid Talks with Jury members of the Festival
-4.00pm onwards – Closing Ceremony of the festival at City Pride, Kothrud.

या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ने सन्मानित अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –

– पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते मात्र मनापासून जे करता ती जीविका ठरते, माझ्या बाबतीत मी कलाकार म्हणून काम करीत असताना जीविका हीच उपजीविका झाली.
– माझ्यावर पु.ल. देशपांडे यांचा प्रभाव आहे. पुलं स्वत:कडेही विनोदाने पाहायचे. ते कोणाची मिमिक्री करतात असं कधीच वाटलं नाही कारण त्यांना त्या भूमिकेतलं मर्म कळलेले होते त्यामुळे पुलं हे पुलं म्हणूनच समोर आले हे त्यांचे वैशिष्ट्य होते .
– ज्याप्रमाणे संगीताला कान लागतो, त्याप्रमाणे विनोदालाही दृष्टी असावी लागते.
– मला लाउड ह्युमरपेक्षा फार आक्रस्ताळेपणा नसलेला, मिश्कील – ज्याला ‘टंग इन चीक’ विनोद म्हणतात तो करायला जास्त आवडते .
– माझ्यात स्वभावत: लाजाळू व्यक्ती आहे, मात्र व्यक्त होण्याची एक आत्मिक इच्छा आधीपासूनच होती, त्यामुळेच विविध माधामात काम करतानाही माझ्या हातून लेखन होऊ शकले
– आजच्या बदललेल्या भाषेचा काही प्रमाणात त्रास होतो. तुझी मदत करू का ? अशीहिंदीचा प्रभाव असलेली वाक्ये येतात तेव्हा वाईट वाटतं.
– माझ्या निरागस हास्यामुळे ‘मुन्नाभाई लगे रहो’ चित्रपटात गांधीजींची भूमिका मिळाली.
– नाटकात भूमिका घडवता येते. सिनेमामध्ये ती आधीच डोक्यात पक्की लागते.
– चित्रपट हे एक प्रभावी आणि दिग्दर्शकाचे माध्यम आहे.
– ‘बायोपिक’ हा विषय संशोधन करीत जबाबदारीने तो विषय हाताळला गेला पाहिजे, असे मला वाटते.
– ल्युई फिशर यांच्या गांधींवरील पुस्ताकामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात गांधी साकारताना मदत झाली. या पुस्तकामुळे एक व्यक्ती म्हणून महात्मा गांधी माझ्या समोर आले.
– मुन्नाभाई या चित्रपटातील महात्मा गांधी यांची व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तीरेखेतला मी प्रेक्षकांना आवडेल का असा प्रश्न होता. मात्र प्रेक्षकांनी हे दोन्ही स्वीकारलं याचा आनंद आहे.
– कोणतीही व्यक्तीरेखा साकारताना मी केवळ दिग्दर्शकावर विश्वास ठेवतो व त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो. मुन्नाभाईच्या वेळी मी तेच केलं.

Day6

Must watch
17th Piff
Wednesday Screening

Mulshi Pattern
Mangala
Screen4
3pm

Andaaz
NFAI
12PM

Pandu Hawaldar
NFAI
3.10PM

Film – 10 Days Before the Wedding: As life slowly returns to normal in the recently freed city of Aden, A number of obstacles stands in the way of a young couple as only 10 days are left for their wedding, each obstacle is in one way or another caused by the aftermath of the 2015 war in Aden; today’s temporary capital of Yemen.

Amr Gamal, Director of the movie was present for the press conference.

1. The movie is made only in 30,000 dollar budget. There is no theatre, no television in Aden, since 3 years because of the war. So the cast said yes to do the movie even they knew that it is going to be a very small budget one.
2. It was difficult to shoot as after the war it was the first movie to be shot on streets. Everyone had the courage to shoot as everyone was anyway dying at home.
3. City people helped us a lot while shooting. They showed some great gesture towards us.
4. The movie became a big hit. As the movie theatres are destroyed in Aden by war, We decided to show this movie in wedding halls using a cheap HD projector.
5. The message he gave was, If a small team like ours can pull off then anybody in the world can. Nothing is impossible.
6. Through the movie we have also tried to show that if war ends it does not mean that peace will come soon. People have fight to make it a happy place.

Film – Shivranjani and two other women: Shivranjani a young college student is a promising sprinter poised to take the athletic world by storm at the National level. Devaki is a working woman with refreshing candour who zealously guards her privacy. Saraswathi is a nurturer who cooks flavourful meals and tends to her baby all day long. Domestic violence, family dynamics and early marriage and pregnancy intrude into their lives.

Vasanth S Sai, Director of the movie was present for the press conference.

1. When asked the reason to title the movie as ‘Shivranjani and two other women’ he said, For me every women is shivranjani so it just a metaphor given to the movie.

2. Before 80’s all the three short stories were written and every time I read it I felt something new in it. So ‘Shivranjani and two other women’ is a short story from the literature. I wanted to express the story in my own way so I decided to make a movie on it.

3. When I was young I could never play cricket on Sundays as I had to accompany my sister to her friends place. My sister was not allowed to go alone and because of that I could not play cricket. That experience is also reflected in some way here.

4. For me acting is nothing but behaving and this is what I insist my artist.

5. In this movie, for any dilemma I would go with my artist, as being a woman they will know better than me.

6. The movie will have big theatrical release after 5-6 months. By now we have received great response from the audience so I have started to dream about the success.

Film- ‘Domestique’

Actress of the movie Tereza Hofova was present for the press conference.

She said, This is a highly conceptual movie. It works with distances. My character is of Sarlota, who is a teacher and wife of the leading male character Roman who is a cyclist. The beginning and the end of the movie moved me.

Film- ‘My own Good’

Screenplay writer Antonella Gaeta was present for the press conference.

She said, As the story of the movie unfolds in an abandoned town, silence and absence were also important elements from which we started. It took several versions for this story to come out as we wanted it to be.