पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात
सहाशे लहान मुलींचे कन्या पूजन
19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात आज ललिता पंचमीच्या निमित्ताने इयत्ता 1 ली ते 4 थी मधील 600 हून अधिक मुलींचे कन्यापूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या या लहान मुलींनी डोक्यावर ‘जय माता दी’ च्या पट्ट्या बांधल्या होत्या. तसेच तांबडा, हिरवा व पिवळा अशा रंगातील पोशाख परिधान करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या तीन रंगातील पंजाबी ड्रेस, परकर पोलके वा पारंपरिक ड्रेस घालून आलेल्या या मुलींचे प्रथम पाय धुवून कुंकवाने त्यांच्या पायावर स्वस्तिक काढण्यात आले. यानंतर गुरूजींच्या मंत्रोचारात या मुलींना पारंपारिक पद्धतीने ओवाळले गेले. तसेच सामुहिक देवीची आरतीही करण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमावेळी शेकडो पालकांनी गर्दी केली होती. यानंतर सर्व मुलींना अल्पोपहार व खाऊ देण्यात आला. तसेच पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील विजेता मुली तसेच सहभागी प्रत्येक मुलीस बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात छाया कातुरे, निर्मला जगताप, दीपा बागुल, हर्षदा बागुल, योगिता निकम, सोनम बागुल, नम्रता जगताप आदींनी विशेष प्रयत्न केले.

फोटो : Kanya Poojan
फोटो ओळ : पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘कन्यापूजन’ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी लहान मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना ओवाळण्यात आले. यावेळी फोटोमध्ये पुणे नवरात्रौ महिला मोहत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल मुलीस कुंकूमतिलक लावताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *