महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त
पुण्यात ‘महात्मा गांधीदर्शन यात्रा’
पुणे- महात्मा गांधीं यांच्या १५० व्या जयंती निमित्त पुण्यात मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी ४ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ‘गांधीदर्शन यात्रा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी याचे आयोजन केले आहे. ही ‘गांधीदर्शन यात्रा’ मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा – शनिपार चौक – लक्ष्मी रोड मार्गे अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक – गोखले चौक (गुडलक चौक) पर्यंत येईल. महात्मा गांधींच्या जीवनातील नौखालीचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चंपारण्यातील नीळ मळ्यातील सत्याग्रह,छोडो भारत आंदोलन,पुणे करार अशा विविध विषयांवर चित्ररथ या ‘गांधीदर्शन यात्रे’त असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *