३०व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये
‘प्रतिभा संगम’ कार्यक्रमाने रसिक तृप्त
ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारीत ‘प्रतिभा संगम’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 22 रोजी संपन्न झाला. याप्रसंगी गदिमांचे सुपुत्र शरद माडगूळकर आणि पुलंचे भाचे डॉ. सुधाकर लोकरे यांचा प्रात्यनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी सई टेंभेकर, सावनी दातार, चैतन्य कुलकर्णी आणि मंदार आपटे ह्या कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची संहितालेखन व निवेदन अरूण नूलकर यांचे होते. पराग माटेगावकर यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले होते. ‘स्वरानंद प्रतिष्ठान’तर्फे प्रकाश भोंडे यांनी याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पराग माटेगावकर,विवेक परांजपे,अनय गाडगीळ,डॉ.राजेंद्र दुरकर,पद्माकर गुजर,वैशाली सप्रे,अभय इंगळे यांनी वाद्यसंगत केली.
ग.दि.मा, बाबुजी, पु.ल. यांची गाजलेली भावगीते, चित्रपटगीते, लावणी, अभंग आदी गीतप्रकारांचा समावेश यामध्ये होता.त्यामध्ये गुरु एक जगी,थकले रे नंदलाला,माझे जीवन गाणे,कबीराचे विणतो शेले,संथ वाहते कृष्णामाई ,हृदयी प्रीत जागते ,इंद्रायणी काठी,त्या तिथे पलीकडे,हा माझा मार्ग एकला,करू देत शृंगार,चंद्र आहे साक्षीला,गीतरामायणातील स्वये श्री रामप्रभू ऐकती,दशरथा घे हे पायसदान ,राम जन्माला ग,तोडीता फुले मी,सेतू बंधा रे,गा बाळांनो,तसेच विठू माऊली,तोच चंद्रमा,नाच रे मोरा,तुझ्या मनात कुणीतरी,अशी पाखरे येती,बुगडी माझी सांडली ग ,ही कुणी छेडली तार,हसले मनी चांदणे,शब्दावाचून कळले,एकाच या जन्मी जणू ,वेदमंत्राहून आम्हा ही अविस्मरणीय गाणी यावेळी सादर केली गेली.प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद त्यास लाभला.

सोबतच पु.लं.च्या (हार्मोनियम) संवादिनी वादनाची झलकही ऐकायला मिळाली. त्यांच्याच “ती फुलराणी’ या गाजलेल्या नाटकातील प्रवेश पौर्णिमा भट यांनी सादर केला. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे ,सांस्कृतिक कार्यकम प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.पुणे फेस्टिव्हलचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह प्रमुख अतुल गोंजारी यांनी आभारप्रदर्शन केले. याचे प्रायोजक डॉ.डीवाय पाटील विद्यापीठ पुणे व एच डी एफ सी हे होते.

फोटो : Pune Festival Pratibha sangam
फोटो ओळ – ३०व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘प्रतिभा संगम’ कार्यक्रम सादर करताना डावीकडून गायक मंदार आपटे, गायक सई टेम्भेकर, संगीत संयोजक पराग पाटेगावकर, गायक सावनी कुलकर्णी, गायक चैतन्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *