३०व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये
मराठी कवी संमेलन संपन्न
३०व्या पुणे फेस्टिवल मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा ही महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असणारे मराठी कवी संमेलन दि. 22 रोजी रात्री 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाले. जेष्ठ वात्र-टिकाकार रामदास फुटाणे यांनी सूत्रसंचालन केले. यामध्ये अरुण म्हात्रे, महेश केळूसकर, साहेबराव ठाणगे, प्रशांत मोरे, सुरेश शिंदे, नारायण पुरी, नितीन देशमुख, रमणी सोनावणे, बी.के. शेख, अनिल दीक्षित हे महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री सहभागी झाले होते.
सध्याची राजकीय परिस्थिती, महागाई, पेट्रोल दरवाढ अशांवर मिश्कील भाष्य करतानाच सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या कविता देखील प्रेक्षकांना हेलावून गेल्या. पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकात दळवी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विश्वेश्वर बँकेचे संचालक सुनील रुकारी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, यांच्या हस्ते कवींचा सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे दि. विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे हे प्रायोजक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *