30व्या पुणे फेस्टिव्हलच्या
श्रींचे विसर्जन
30व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींचे विसर्जन रविवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता पर्वती कॅनॉल येथे झाले. हॉटेल सारस नेहरू स्टेडियम येथे श्रींची विधिवत पूजा वेदमुर्ती धनंजय घाटे गुरूजी यांच्या हस्ते करून सजावलेल्या गाडीतून श्रींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. यामध्ये पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे (ढोल), प्रसिद्धी प्रमुख प्रविण प्र. वाळिंबे (हलगी) आणि उगवते तारे – इंद्रधनूचे संयोजक रविंद्र दुर्वे (ताशा) अशा वाद्यांसह सहभागी झाले होते. पर्वती कॅनॉल येथे विधिवत पूजा करून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींचे विसर्जन हावदा मध्ये करण्यात आले. यावेळी विनेश परदेशी, नामदेव साळके, सचिन खवले, महेश माने, विजय शेट्टे, सुभाष सुर्वे, विकी जाधव आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : Pune Festival Shreenche visrajan.
फोटो ओळ : 30व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींच्या विसर्जन मिरवणूकीत पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे (ढोल), प्रसिद्ध प्रमुख प्रविण प्र. वाळिंबे (हलगी) आणि उगवते तारे – इंद्रधनू चे संयोजक रविंद्र दुर्वे (ताशा) हे वाद्य वाजवत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *