मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांच्या प्रवचनांचा
दि.१२ ऑगस्टपासून ज्ञानगंगा महोत्सव
विविध उपक्रम साजरे होणार
आपल्या प्रखर वाणीने आणि तेजस्वी विचारांनी देशभर पायी अनवाणी फिरून धर्म जागरण व समाज प्रबोधन करणारे दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास पुण्यात सुरु झाला आहे. ‘ज्ञानयज्ञ का मंगल सोहळा – संस्कारो का शंखनाद’ अशा शब्दात गौरवल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रखर प्रवचनांचा ‘ज्ञानगंगा महोत्सव’ दि.१२ ऑगस्टपासून धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलानजीक, पुणे येथे सुरु होत आहे. धर्मजागरण व समाजप्रबोधन यावर विशेष भर असणारी प्रवचनांची ही मालिका सलग २३ दिवस म्हणजे ३ सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी ८:१५ ते १०:०० या वेळेत संपन्न होईल. ‘जिनवाणी’ वाहिनीवरून याचे रोज थेट प्रक्षेपण केले जाणार आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी समितीचे उपाध्यक्ष चकोर गांधी, उपाध्यक्ष सुजाता शहा,सचिव जितेंद्र शहा,सचिव शमा अजमेरा,खजिनदार उत्कर्ष गांधी, खजिनदार विरकुमार शहा आदी उपस्थित होते.
ज्ञानगंगा महोत्सवाचे उद्घाटन मुनीश्रींच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८:१५ वाजता होईल. त्यावेळी मुनीश्रींची एकूण १६ पुस्तकेही प्रकाशित केली जातील. तसेच मुनिश्रींच्या पुण्यातील चातुर्मासानिमित्त आयोजित विविध घटना व उपक्रमांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी होईल. या प्रवचनांसाठी रोज ५००० हजारहून अधिक भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुणे व परिसर आणि महाराष्ट्र व देशातूनही अनेक जैन भाविक येणे अपेक्षित आहे. पुणे व परिसरातील जैन व जैनेतर भाविकांना मुनिश्रींच्या प्रवचनांचा लाभ मिळावा यासाठी संयोजकांतर्फे विविध ठिकाणाहून विनामूल्य बसेसची सोय करण्यात आली आहे.त्यामध्ये निगडी,आकुर्डी,पिंपरी-चिंचवड,वाकड,हिंजेवाडी,सुस,हडपसर,पिंपळे सौदागर,खराडी,विमाननगर आदी भागातून बसेस सोडण्यात येतील.आणि याच बसेस द्वारा त्यांना परत जाण्याचीही सोय करण्यात आली आहे.सर्व भाविकांची विनामूल्य भोजनाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेनंतर मुनीश्री पुलक सागर जी महाराज यांची पत्रकारांनी भेट घेतली.या वेळी पत्रकारांना आपली पुस्तके भेट देऊन मुनीश्री म्हणाले की,माणसा माणसा मधील स्नेह वाढला पाहिजे,नैतिकता आणि माणुसकी ही अध्यात्मिक शांतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.राष्ट्रप्रेमानी तरुणानी भारुन गेले पाहिजे त्यासाठी सत्संगाची गरज आहे.असे सांगून मराठी ही भाषा देखील अतिशय गोड आहे असे सांगत त्यांनी समारोप केला.
या चातुर्मासानिमित्य अनेक मान्यवर मुनिश्रींची भेट घेणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी येण्याचे मान्य केले आहे.असे सांगून मिलिंद फडे व शोभा धारिवाल म्हणाल्या की,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुनिश्रींची भेट घेतली असून प्रवचनांसाठी पुन्हा

येणार असल्याचे सांगितले आहे.याशिवाय आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिलेल्या ज्या जैनेतर विद्यार्थ्यांनी मांसाहाराचा त्याग करून शाकाहाराची शपथ घेतली अशा सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी सकळी चातुर्मास स्थळी होणार आहे.दि.१७ ऑगस्ट रोजी भगवान पार्श्वनाथ महानिर्वाण दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्त्य सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग दिगंबर जैन मंदिर येथून भव्य शोभायात्रा निघून राजाराम पुलानाजीकच्या चातुर्मास मंडपात येईल.दि.१८ ऑगस्ट रोजी महिलांचे कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून दि २० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जाणार आहे. दि २५ ऑगस्ट रोजी फेलीसिनियावर तज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची ही २३ प्रवचने सामाजिक, पारिवारिक ,राष्ट्रप्रेम अशा विविध गटांमध्ये विभागली असून त्यांचे विषय पुढीलप्रमाणे- आईशिवाय कोणी मोठा नाही, भाऊ नसता तर, मुलीचे घर, स्वातंत्र्याचा महोत्सव, मित्र कसा असावा, म.पार्श्वनाथ निर्वाशोत्सव, प्रेम म्हणजे जीवनाचा महामंत्र, मुली वाचवा, उत्तम करियर, असे बोलावे, रागावर नियंत्रण कसे मिळवावे, वृद्धत्वात कसे जगावे, यमराजाची चिठ्ठी, आम्ही उद्याची चिंता करीत नाही, वात्सल्य दिवस, गुजराण कशी करावी, नम्रपणे जगण्याची कला, एक थेंब पाणी, वसियतनाम, मांसाहार हा अपराध, समाज निर्वाण, बाटलीचे तुफान.
अशा विविध विषयांवर होणारी मुनिश्रींची ही प्रवचने हिंदी भाषेतून होतील. ‘सिर्फ जैनों का ही नही जन जन का आमंत्रण है’ अशा शब्दात मुनिश्रींच्या या प्रवचनांचे महत्व श्रीमती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी विशद केले. या कालावधीत आर एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचेही रोज दिवसभर आयोजन होणार आहे. रोज सायंकाळी भगवान व मुनिश्रींची आरती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *