मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली.

पुण्यात धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे चातुर्मास चालू असलेल्या दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांची कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दुपारी भेट घेतली आणि मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मुनीश्रींनी पृथ्वीराज चव्हाण यांना विविध पुस्तके व ग्रंथ भेट दिले. दि.१२ ऑगस्ट पासून येथे सुरु होणाऱ्या मुनिश्रींच्या ‘ज्ञानगंगा महोत्सवा’त मी आवर्जून येईन असे पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड होते. याप्रसंगी संयोजक सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे पुष्प्गुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी जितेंद्र शहा, सुजाता शहा, अजित पाटील, अभय कोठारी, आनंदी शहा आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांना पुण्यात भेटून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. सोबत समितेच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, अॅड.अभय छाजेड, अभय कोठारी व मिलिंद फडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *