मुनिश्री पुलकसागरजींचा चातुर्मास सुरू, विविध कार्यक्रमांचे आयोजन

“” दशरथाने दिलेल्या एका वचनासाठी रामाला त्याच्या राज्यापासून दूर वनवासात राहावे लागले. परंतु वाल्मीकी ऋषींनी रामायण लिहून रामाला पुन्हा सर्वांच्या घरात पोहचविले. हीच साहित्याची खरी ताकद असते. संत विचारांना, चांगल्या विचारांना लोकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे काम साहित्य करत असते.

असे साहित्य रचणाऱ्या साहित्यिकांचादेखील या कामात महत्वाचे योगदान असते. अशा शब्दांत प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी साहित्यिकांचे महत्व अधोरेखित केले.

जैन बांधवांच्या चातुर्मास पर्वाचा रविवारपासून प्रारंभ झाला. याप्रसंगी सकल जैन वर्षायोग समिती तर्फे मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या चातुर्मासाचे महालक्ष्मी लॉन्स येथील रसिकलाल एम. धारीवाल नगरी येथे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच “पंचरंग प्रबोधिनी’ व “पुलकवाणी’ या दोन मासिकांच्या मुनिश्रींवरील आधारित विशेषांकाचे प्रकाशनही झाले. चंदुकाका सराफ’चे मालक अतुल शहा यांचे सुपुत्र आदित्य शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर सौ. निर्मला व श्री. बाबासाहेब खोत यांच्या हस्ते मंडपाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी भगवान महावीर आणि पुलकसागरमहाज यांचे गुरू पुष्पादंतसागरजी महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. यावेळी पुणे महिला जागृती मंचाच्या महिलांनी मंगलाचरण सादर केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रकाशन सोहळा प्रारंभ झाला. विशेषाकांच्या प्रकाशनप्रसंगी यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, पुलकवाणीच्या संपादिका डॉ. निलिम जैन, पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ. रावसाहेब पाटील, प्रदीप बडजात्या, अरविंद जैन, वीरकुमार शहा, जीतेंद्र शहा, उत्कर्ष गांधी, अजित पाटील, सुधीन खोत,प्रदीपमामा जैन, सोहनलालजी काला, अंकित जैन, सुजाता शहा,आनंदी शहा, उज्वला शहा, वैजयंती शहा, सुजाता घूस, भूषण शहा, प्रकाश शेडवाळे, संजय नाईक, ज्योती गांधी, प्रकाश चिवटे, किरण कोळेकर आदी उपस्थित होते. जलसंपदा राज्यमंत्री आमदार विजय शिवतारे यांनीदेखील मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तर मुंबई, बांसवाडा(राजस्थान) आणि पुणे महिला जागृती मंडळ कलाकारांनी नृत्ये सादर केली.

यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करत मुनिश्री म्हणाले,”” संत म्हणजे एखादा हाडा-मांसाचा पुतळा नव्हे, संत म्हणजे संवेदना असतात. दुसऱ्याचे दुख पाहून जो स्वत: तडफडतो, ज्याच्या डोळ्यात अश्रु येतात, तो संत असतो. तसेच संत हा तुमच्या जीवनातील मित्र, गुरू असतो. संत हे स्वत:साठी न जगता दुसऱ्यांना त्रासापासून दूर ठेवण्यासाठी जगत असतात, साधना करतात.”
दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलकलशाचे पूजनही करण्यात आले. व चातुर्मास पर्वास प्रारंभ झाला. याप्रसंगी आर.एम .धारिवाल फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उपस्थितांनी चांचला प्रतिसाद दिला

कळावे,

———-
> फोटो ओळ :

* मुनीश्री प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा चातुर्मास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्समी लॉन्स, पुणे येथे सुरू झाला. त्याप्रसंगी उपस्थित महिला व पुरुष भाविकांची गर्दी.

* भगवान महावीर व आचार्य पुष्पदंतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.

* याप्रसंगी सादर झालेले नृत्यविष्कार.

* पंचरंगी जैन द्वजाचे ध्वजारोहन आदित्य शहा (चंदुकाका सराफ) यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मुनीश्री, शोभा धारिवाल, मिलींद फडे, इत्यादी.

* पूलकवानी प्रकाशन- डावीकडून मिलिंद फडे, उत्कर्ष गांधी, वीरकुमार शहा, अभय कोठारी, अजित पाटील, डॉ. नीलम जैन, सुजाता शहा, शोभा धारिवाल, ललित जैन, डॉ. रावसाहेब पाटील, प्रदीपमामा, सोहनलालजी काला (उदयपूर), अंकीत जैन (दिल्ली), जितेंद्र शहा.

* दीपप्रज्वलन – डावीकडून डॉ. सुरेश जैन (सिल्वासा), शोभा धारिवाल, सौ. प्रतिभामामी, प्रदीपमामा जैन, आजीत विनायका (सुरत )इत्यादी.

* भगवान महावीर व आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.

* मंडपाचे उद्धघाटन – मुनीश्री समवेत बाबासाहेब खोत व सौ. निर्मला खोत व आदी मान्यवर.

* सोलापूरचे डॉ. रावसाहेब पाटील संपादीत ‘पंचरंग प्रबोधिनी’ या मुनीश्रींवरील विशेष अंकाचे प्रकाशन डावीकडून डॉ. नीलम जैन, सुजाता शहा, शोभा धारिवाल, डॉ. रावसाहेब पाटील, मिलींद फडे, मुनीश्रींचे संघपती प्रदीपमामा जैन व सौ. प्रतिभा मामी, संजय नाईक.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *