कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीगीत कार्यक्रम संपन्न

आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील गेली ३० वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या व स.प.महाविद्यालय, पुणे येथून प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या गायिका सुजाता सोमण व शिष्या यांच्या सुगीता भक्ती मंडळातर्फे भक्तिमय मैफल दिमाखदारपणे सादर करण्यात आली. ही मैफल श्रीमंत दगडूशेठ दत्त मंदिर येथे उभारण्यात आलेल्या मंडपात पार पडली.
कबीरदास यांच्या गुरूंचे वर्णन करणाऱ्या दोह्यांनी मैफलीस प्रारंभ झाला. त्यानंतर गणराज गजानन आवोनी, शंभो शंकरा, गुरुदेवा, सुंदर माझं जातं गं अशा गणपती, विठ्ठल यांचे वर्णन करणाऱ्या भक्तिमय रचना तसेच आईभवानी, ताकधीनाधीन बाजे बाजा, स्मराहो दत्तगुरू दिनरात या रचनांही उत्तम सादर झाल्या. या कार्यक्रमामध्ये आपल्या आवाजानी सोमण यांच्या शिष्या सुषमा राठी, शीला लिंगसूर, मालती जोशी, शोभा शहा, उर्मिला प्रधान, कुंदा कुलकर्णी, नंदा कांबळे सर्वांना मंत्रमुग्ध केले.
सुषमा राठी, शीला लिंगसूर यांनी गुरुंवरील इंदुमती जोशी रचित रचना सादर करून सर्वांना जागीच खिळवले. या मैफलीस हार्मोनियमची साथ सुजाता सोमण, तबला तन्मयी मेहेंदळे अशी लाभली होती.

कळावे,

फोटो ओळ – सुगीता भक्ती मंडळातील गायिका सुषमा राठी, शीला लिंगसूर, मालती जोशी, शोभा शहा, उर्मिला प्रधान, कुंदा कुलकर्णी, नंदा कांबळे आणि हार्मोनियमवर सुजाता सोमण व तबल्यावर तन्मयी मेहेंदळे सादरीकरण करताना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *