पुलवामा दहशतवादी हल्ल्याला40 दिवस पुर्ण

सर्वधर्मिय प्रार्थनेस मोठा प्रतिसाद

 

            काश्मिरमधील पुलवामा येथे 14फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला40 दिवस झाल्यानिमित्त पुणे ख्रिश्चन फोरमतर्फे सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन नाना पेठेतील वायएमसीए हॉल येथे संपन्न झाले. याप्रसंगी शांततेचे प्रतिक म्हणून आठ कबूतरे सोडली गेली. त्यानंतर दीप्रप्रज्वलन व उपस्थित सहभागी सर्व नागरिकांसह सामुहिक प्रार्थना केली गेली. याप्रसंगी पुण्याचे बिशप डॉ. थॉमस डाबरे, वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, बिशप पॉल दुपारे, मौलाना निजामुद्दीन, शिख समाजाचे राजसिंग आरोरा,बौद्ध भंत्ते सुदासन, कारगिल युद्धात सहभागी झालेले व पुणे सैनिक बोर्डाचे संचालक मेजर मिलिंद तुंगार आणि साधू वासवानी मिशनच्या श्रीमती सीमा मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व जाती धर्मातील हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.

            याप्रसंगी सर्व धर्मगुरूंनी विश्वशांती व्हावी तसेच दहशवादाचा कायमचा बिमोड होऊन शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना व मंत्रपठण केले. तसेच सिस्टर बिंदू व सेंट जॉन द बॅप्टीस्ट सिस्टर्स यांनी नृत्याविष्कार सादर करून शांततेचा संदेश दिला. फादर रॉक ग्रीन यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कारगिल युद्धात सहभागी झालेले मेजर मिलिंद तुंगार यांनी सेनादलात सर्व धर्माचे पालन अतिशय आनंदाने एकत्रित व खेळीमेळीने केले जाते व सर्व धर्मांचा आदर केला जातो हे आवर्जून सांगितले. सर्वच धर्मगुरूंनी दहशतवादाचा बिमोड व्हावा व शांततामय जीवन निर्माण व्हावे याबद्दल आपापले विचार मांडले आणि दहशतवादाचा निश्चित पराभव होईल असा विश्वास व्यक्त केला.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र शालू यांनी केले. अमलराज फँ्रसिस यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात एडविन रॉबर्टस्, अमलराज फ्रान्सीस, डॉमनिक फर्नांडिस, अन्थोंनी जेकब,पिटर इनसोल, सुधीर मॉरीस, फ्रँकी मेन्डोझा,स्टॅन्ली मोजेस, केविन विलीयम, सॅम्युअल नेगल, मोझेस हेरेकेरूर, दिलरात पिल्ले, पिटर डिसूजा, बेंजामिन डिसूजा, जॅकलिन फॉरेस्टर,आशिष जाधव, सतिश चांदेकर, मायकल सेलवम व सॅमसन नायडू आदींनी विशेष प्रयत्न केले.

 

 

फोटो ओळ ः

1. दीपप्रज्ज्वलन करताना (डावीकडून) पीटर इनसोल, अमलराज फ्रान्सीस, बिशप डॉ. थॉमस डाबरे, बिशप पॉल दुपारे, बौद्ध भंत्ते सुदासन, वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, मेजर मिलिंद तुंगार आणि डॉमनिक फर्नांडिस.

2. याप्रसंगी (डावीकडून) व्यासपिठावर श्रीमती सिमा, श्री. तांबोळी, मेजर मिलिंद तुंगार, बिशप डॉ. थॉमस डाबरे, वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, बिशप पॉल दुपारे आणि बौद्ध भंत्ते सुदासन.

3. सिस्टर बिंदू व सेंट जॉन द बॅप्टीस्ट सिस्टर्स व सहकलावंतांनी नृत्यातून शांततेचा संदेश दिला.

4. याप्रसंगी शांततेचे प्रतिक असणारी कबुत्तरे सोडण्यात आली. सोबत (डावीकडून) बिशप डॉ. थॉमस डाबरे,वेदमुर्ती मोरेश्वर घैसास गुरूजी, बौद्ध भंत्ते सुदासन, फादर रॉक ग्रीन आणि डॉमनिक फर्नांडिस इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *