शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव

गणेश वंदना रंगीत तालिम

18वा शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव रविवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी शनिवारवाडा समोरील प्रांगणात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरूवात प्रख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर आणि त्यांच्या नुपूरनाद संस्थेच्या 11 शिष्यांनी सादर केलेल्या गणेशवंदनाने होईल.

याची रंगीत तालीम काल शनिवारवाडा समोरील प्रांगणातील रंगमंचावर करण्यात आली.

त्यामध्ये डॉ. स्वाती दैठणकर व त्यांच्या शिष्या. ही गणेशवंदना सुमारे 5.30 मिनिटांची असून याचे संगीत ज्येष्ठ संतुरवादक पं. डॉ. धनंजय दैठणकर यांचे आहे. तसेच याचे गायन पं. रघुनंदन पणशीकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *