संगीताच्या साधनेसाठी रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक : फैयाज हुसेन

संगीताच्या साधनेसाठी
रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक : फैयाज हुसेन
पंडित विनायक फाटक यांच्यासारख्या ज्येष्ठ गुरुने शेकडो शिष्य तयार केलेत ही मोठी संगीत सेवा आहे असे सांगत ज्येष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन यांनी आज ज्येष्ठ तबलावादक विनायक फाटक यांच्या 71व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांचा सत्कार केला. जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांचे शिष्य व रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी पुढे बोलताना ज्येष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन म्हणाले की, गायन वादन नृत्य यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी संगीत शिकायला लागल्या पासून 40 दिवस घराच्या बाहेर न पडता सतत रियाझ करून कला अजून वाढवावी. संगीताच्या साधनेसाठी रियाझ सातत्य आणि आजन्म शिष्य बनून संगीताची सेवा केली पाहिजे असे ते म्हणाले.
कलासागरतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय राज्यनाट्य संमेलनात कलारत्न 2018 हा पुरस्कार पंडित विनायक फाटक यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा या मैफलीत करण्यात आली.
जेष्ठ तबला वादक पंडित विनायक फाटक यांच्या 71व्या वर्षातील पदार्पण सोहळ्या निमित्ताने संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत प्रथम विनायक फाटक यांच्या कन्या आणि ख्यातनाम गायिका डॉ. रेवा नातू यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. प्रथम राग यमन मधील ‘देहो दान मोहे’ या विलंबित झुमरा या बड्याख्यालाने मैफलीस सुरुवात झाली त्यानंतर नातू यांनी ‘ननदिके बचनवा सहेन जाये’ ही तीनतालात पारंपारिक बंदिश डॉ. नातू यांनी सादर केली. त्याला जोडून उदानी दानी तदानी हा द्रुत त्रितालात ताराना अत्यंत कसदारपणे सादर करून सर्वांना जागीच खिळवून ठेवले. त्यानंतर पंडित बलवंतराय भट्ट यांचा राग अडाणा मध्ये ‘होरी होरी खेलत नंदलाल’ हा चतरंग सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रेवा नातू यांना संवादिनी साथ लीलाधर चक्रदेव यांनी तर तबला साथ विवेक भालेराव यांनी आणि तांपुर्याची साथ प्रणाली पवार यांनी केली.
त्यानंतर जेष्ठ तबलावादक पंडित विनायक फाटक यांचे स्वतंत्र तबलावादन सादर झाले. त्यांना सह तबला वादनाची संगत त्यांचे सुपुत्र प्रशांत फाटक यांची लाभलेली होती. यामध्ये प्रथम पेशकार, कायदे, मुखडे तुकडे, रेला, परण आणि विविध पारंपारिक उस्तादांच्या रचनांचा समावेश स्वतंत्र तबलावदनामध्ये करण्यात आला. अतिशय कसदार आणि दमदारपणे तबल्यातील बारकाई आणि रियाझ कसा गरजेचा आहे याचे मार्गदर्शन आपल्या वादनातून पंडित विनायक फाटक यांनी केले. फाटक यांना उदय शहापूरकर यांची नगमासाथ लाभलेली होती. या मैफलीला जेष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन हे प्रमुख पाहुणेपदी लाभले. ध्वनी व्यवस्था रवी मेघावत यांची लाभली होती व सूत्रसंचालन पराग आगटे यांनी केले.
कळावे.

फोटो ओळ ः ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक फाटक यांच्या 71व्या वर्षात पदार्पणानिमित्त स्वरमयी गुरूकुल येथे आयोजित ‘स्वर ताल मयी’ मैफली प्रसंगी (डावीकडून) पं. विनायक फाटक, फैयाज हुसेन, प्रशांत फाटक व डॉ. रेवा नातू.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>