Closing cereminy 8th Asian Film Festival

आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महोत्सवाचे आयोजक सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, किरण धिवार या प्रसंगी उपस्थित होते.

प्रभावळकर म्हणाले, चित्रपटाच्या क्षेत्रातील आदर्श म्हणून कोणा एकाचे नाव मला घेता येणार नाही. ज्या ज्या अभिनेत्यांबरोबर मी काम केले, त्यांचे मी निरीक्षण केले आणि त्यातून मला भरपूर शिकायला मिळाले. गजेंद्र अहिरे, क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार अशा तरुण दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांच्याबरोबर काम करताना मिळणारी नवीन ऊर्जा, नवीन कल्पना असे सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळते. नवीन कल्पनांचा स्वीकार करण्यासाठी खुल्या असलेल्या कलाकारांसाठी प्रत्येक टप्प्यावर शिकण्यासारखे खूप काही असते. सुमित्रा भावे यांच्याबरोबर काम करण्याची संधी अद्याप मिळाली नाही.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>