गुणवत्ता व उद्योजकता यावर विशेष परिषदेचे आयोजन

अ‍ॅस्पायर क्नॉलेज अ‍ॅन्ड स्किल्स या पुण्यातील संस्थेतर्फे मंगळवार दि. 30 जानेवारी 2018 रोजी सायं. 4.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘स्किल अ‍ॅन्ड एंटरप्रिनरशिप कॉन्क्लेव्ह’ ही गुणवत्ता व उद्योजकता विषयक एक दिवसाची परिषद आयोजित करण्यात आली आहे. कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरूण फिरोदिया, आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांची या प्रसंगी मुख्य व्याख्याने होणार असून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

याप्रसंगी महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश बेद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘आयटी करिअर्स 2020++’ या पुस्तकाचे प्रकाशन या समारंभात केले जाईल. तसेच ऑटोटेक सेंटर लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के.डी. राठोड यांना ‘इनोव्हेशन अ‍ॅवार्ड’ देऊन सन्मानित केले जाईल. अशी माहिती अ‍ॅस्पायर क्नॉलेज अ‍ॅन्ड स्किल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी दिली.

याप्रसंगी अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरचे डायरेक्टर जनरल अनंत सरदेशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त लहुराज माळी हे सन्मानीय अतिथी असतील.

महिला व बालकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त राहुल मोरे, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणचे सहसंचालक चंद्रकांत निनाले, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या शास्त्र विभागाचे माजी डीन डॉ. के.सी. मोहिते, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तुपे हे विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बोधी महिला सेवाभावी संस्थेचे सहकार्य यास लाभले आहे.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>