There is no Nepotism,’ expressed Rishi Kapoor

Out of 105 years of Hindi Film Industry, the famously known Kapoor Khandaan (Kapoor family) have been present and contributed for atleast 90 years proudly informed Rishi Kapoor, profound actor and son of Raj Kapoor. “It is an advantage to be born in epic Kapoor family and to be known by that name but it also a burden because there are lots on expectations put on you. There is no nepotism in the hindi film industry. An actor cannot be forced on audience. It is the audience who chooses an actor and politician,” said Kapoor during a candid talk on ‘Contribution of An Actor to Cinema’ oraganised at 16th Pune International Film Festival’s PIFF Forum and conducted by Dr. Jabbar Patel, Director, PIFF on Janaury 13 at City Pride Kothrud.

While citing his 45 years long journey in the cinema Kapoor said, “I am no champion, no great name just a small actor who loves working for cinema. I like to call myself as son of famous father and father of famous son. I am just a hyphen.” He further mentioned that there are only two types of artist i.e actor and non-actor.

Kapoor, winner of National Award at young age of 15 years declared that Present is the time he loves working in films as it is only recently that he has got choice of acting. He exclaimed that, “First 25 years of my acting career all I was asked to do was wear jersey, romance heroins, sing and dance around tress with them and travel to exquisite locations to film it. Got acting chance in my second innings let me score run. I am passionate about acting and would like to be known for my work.”

Kapoor also described his role as a 90 year old played by him in recent movie Kapoor & Sons. “I am very impatient and I challenged my trait by sitting for 5-6 hours just get the prosthetics and make-up done for my role. It was a very different experience and I enjoyed doing my part as an actor.”

He further stated that, “An actor represents certain time capsules and I strongly believe that no one ever can play the role of Akbar of Mughal-e-Azam better than my grandfather Prithiviraj Kapoor. And I am still averse when it comes to do a remake of classic. In my opinion one must never temper the classic.”

On asked about his father, he said Raj Kapoor is my Guru and best role played by him was in the movie ‘Jagte Raho’. He added, “Raj Kapoor has been an institution and a school teacher who will make you learn life in most real ways.” And while sharing anecdotes of working with Raj Kapoor he described one incident from his first movie Bobby where he was to shoot his first ever song and was thrown in deep end waters by his father. “I remember when I reached the set to film ‘Me shayar to nahi’ song, there was no choreographer to help me with the shoot. I asked Sahab (Raj Kapoor) about it and he strictly said there is no need of one. I got very upset and nervous about it as it was my first time. But he was certain about it as he wanted me to have my own signature style and not to be called as copying someone else.”

While concluding the session he expressed that Marathi cinema is reaching new heights today and felt sorry for not being able to act in it till date. He also bespoke of his disliking of current music and lyrics used in recent era of Hindi Cinema


In the afternoon session, Samar Nakhate, Vice President, PIFF and known critic was in conversation with Gajendra Ahire, Director and Ashwini Sidhwani, Producer of movie ‘Pimpal’.

While telling about the movie, Gajendra Ahire said the following point:

Point 1: My 17 years old son told me the story of Pimpal which I really liked and decided to make it as a movie.

Point 2: This story of Pimpal is about restlessness and search of something. It is basically centred around the idea that ‘one tries to find something which is lost and at times dont even know what is the search for’

Point 3: The film cast includes eminent actors like Dilip Prabhawalkar and Priya Bapat. It was an enriching experience to work with Prabhawalkar. He is an outstanding teacher as well as student.

Marathi Press Release

‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही’- ऋषी कपूर

-‘पिफ फोरम’मध्ये ऋषी कपूर यांनी उलगडला अभिनयाविषयाचा दृष्टीकोन

-राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या हृद्य आठवणीही जागवल्या

: ‘‘कपूर घराण्यात जन्माला आल्यामुळे तुम्हाला एक विशेष ओळख मिळते, पण त्याच वेळी तुमच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आणि जबाबदारी असते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असे म्हटले जाते, परंतु माझ्या मते ते खरे नाही. रणबीर कपूर, करीना कपूर यांचे पहिले सिनेमे तिकीट खिडकीवर चालले नाहीत, पण तुमच्यात अभिनयाचे गुण असतील तर तुम्ही यशस्वी होताच. कोणताही अभिनेता प्रेक्षकांच्या माथी मारता येत नाही. अभिनेते आणि राजकारणी हे लोक स्वत:च निवडतात,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी केले.

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील ‘पिफ फोरम’मध्ये ‘काँट्रीब्यूशन ऑफ अॅन अॅक्टर इन सिनेमा’ या विषयावर ऋषी कपूर यांच्याशी गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कपूर यांची मुलाखत घेतली.

‘मी एका प्रचंड लोकप्रियता असलेल्या वडिलांचा मुलगा आणि एका लोकप्रिय मुलाचा पिता आहे. मी एक लहान अभिनेता आहे. पण माझ्या रक्तात अभिनय आहे आणि माझे काम मी खूप मनापासून करतो,’ असे सांगत ऋषी कपूर यांनी अभिनयाविषयीचे आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘माझ्या मते ‘चांगला अभिनेता’ किंवा ‘वाईट अभिनेता’ असे काही नसते. अभिनेत्यांचे ‘अॅक्टर’ आणि ‘नॉन अॅक्टर’ एवढे दोनच प्रकार असतात. जो मुळात अभिनेता नाहीच तो केवळ ‘पोस्टमॅन’सारखे दिग्दर्शकाने सांगितलेले काम स्वत:चे काहीही न देता पडद्यावर दाखवतो. मला माझ्या कारकीर्दीची २५ वर्षे ख-या अर्थाने अभिनय करण्याची संधीच मिळाली नाही. ‘तुम जर्सी पहनो, गाना गाओ और स्वित्झरलँडमध्ये हिरोईनके पीछे भागो,’ असे मला सांगितले जायचे. आता माझ्या ‘सेकंड इनिंग’मध्ये मला चांगल्या भूमिका मिळू लागल्या आहे. त्यामुळे आता मी मजा घेऊन काम करतो.’’

वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांचे हृद्य किस्से सांगत ऋषी कपूर यांनी त्यांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले, ‘‘माझे वडील राज कपूर हा मोठा माणूस आहे याची जाणीव आम्हा भावंडांना लहान वयातच झाली होती. ते सर्वार्थाने माझे गुरू आहेत. ‘बॉबी’ हा चित्रपट त्यांनी ठरवून मला चित्रपटांत ‘लाँच’ करण्यासाठी बनवला नाही. मी योगायोगाने त्या चित्रपटाचा भाग झालो. त्या वेळी मी अवघा २०-२२ वर्षांचा होतो. पडद्यावर गाणे म्हणण्याचा अभिनय कसा करतात हे मला अजिबात माहीत नव्हते. त्यापूर्वीच्या ‘मेरा नाम जोकर’मध्ये मी केवळ त्यांनी सांगितले तसे केले होते. ‘बॉबी’चे पहिले गाणे चित्रित झाले तेव्हा ‘नृत्यदिग्दर्शक कुठे आहे,’ अशी विचारणा मी त्यांना केली. तेव्हा ‘तू तुला येईल तसा अभिनय कर, स्वत:ची ओळख स्वत: तयार कर,’ असे उत्तर देत त्यांनी मला उडवून लावले. पण तो माझ्यासाठी एक धडा होता. पडद्यावर मी कधीही कुणाची नक्कल केली नाही.’’ शहनशाह अकबराच्या भूमिकेत आपण पृथ्वीराज कपूर यांच्याशिवाय कुणाचा विचारही करू शकत नाही, असेही ऋषी कपूर यांनी सागितले. राज कपूर यांच्या चित्रपटांचा ‘रीमेक’ करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘विशिष्ट जुन्या चित्रपटांची एक छबी लोकांच्या मनात असल्यामुळे त्यांना हात लावू नये,’ असे ते म्हणाले.

आज मराठी चित्रपट तिकीट खिडकीवर उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगत ऋषी कपूर यांनी ‘सैराट’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. ‘मराठीतील नवीन लेखक आव्हाने स्वीकारून चांगले चित्रपट लिहीत आहेत, अनेक चांगले अभिनेते मराठीत आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक व्यक्त केले.


आज- १३ जानेवारी २०१८ रोजी ‘पिफ फोरम’मध्ये दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘पिंपळ’ या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ समीक्षक समर नखाते यांनी अहिरे आणि निर्मात्या अश्विनी सिधवानी यांच्याशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत गजेंद्र अहिरे यांनी सांगितलेले मुद्दे खालीलप्रमाणे-

-‘पिंपळ’ या चित्रपटाची कथा माझ्या मुलाला त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी सुचली. ‘सुंबरान’ या माझ्या चित्रपटाच्या दरम्यान आम्ही धनगरांच्या मागे भटकत होतो. त्या प्रक्रियेत ही कथा त्याच्या मनात रुजली असावी.

-अस्वस्थ आणि रिकामी झालेली माणसे आपल्याला आसपास दिसत असतात. त्यांच्यात मला ‘पिंपळ’ हा चित्रपट सापडला. एखादी गोष्ट आपण अनेक वर्षांपासून शोधत असतो, ती अस्वस्थता त्रास देत असते. पण नेमके काय आणि कुठे शोधायचे ते लक्षात येत नसते. त्याची ही कथा आहे.

-‘पिंपळ’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि प्रिया बापट यांच्या भूमिका आहेत. प्रभावळकरांसारखा शिक्षक आणि त्यांच्यासारखा विद्यार्थी नाही. त्यांच्याबरोबर काम करताना आपणही समृद्ध होतो.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>