PFA Photo and Photo Caption for the inaugural function of 16th Pune International Film Festival.

English Photo Caption

Photo Caption: The 16th Pune International Film Festival(PIFF) which is held in collaboration with Pune Film Foundation and Government of Maharashtra kick started from Thursday, January 11, 2018 at City Pride Kothrud.

Sudhir Mungantiwar, Finance & Planning and Forest Minister presented the ‘PIFF Distinguished Award’ to Ramesh Sippy, Hindi film Director, specially known for directing the popular and critically acclaimed film Sholay, Ramesh Prasad, film producer, Chairman and Head of Prasad Studios for their outstanding contribution to Indian Cinema. Secondly, the prestigious ‘S.D. Burman International Award for Creative Sound and Music’ will be presented to S.P. Balasubrahmanyam, famous playback singer and music composer this year. Mungantiwar also presented Rs. 11.5 lac from Forest Department to PIFF.

PIFF will have a special section ‘Raj Kapoor Retrospective’ as an empathy and tribute to R.K Studio because of their recent loss to fire. Randhir Kapoor, Rishi Kapoor and Rajiv Kapoor were present at PIFF to handover the most valuable negatives of 23 Raj Kapoor’s movies for preservation at National Film Archives of India (NFAI) and handed it over to Prakash Magdum, Director, NFAI.

Photo 1: (L-R) Dr. Jabbar Patel, S.P. Balasubrahmanyam while recieving ‘S.D. Burman International Award for Creative Sound and Music’ at the hands of Sudhir Mungantiwar, Randhir Kapoor and Rishi Kapoor.

Photo 2: (L-R) Dr. Jabbar Patel was present while Sudhir Mungantiwar presented Ramesh Sippy with ‘PIFF Distinguished Award’ while Rajiv Kapoor, Randhir Kapoor and Rishi Kapoor.

Photo 3: (L-R) Dr. Jabbar Patel, Prakash Magdum recieving the negatives of 23 Raj Kapoor movies from Rajiv Kapoor, Randhir Kapoor and Rishi Kapoor.

Photo 4: (L-R) Dr. Jabbar Patel, S.P. Balasubrahmanyam, Ramesh Prasad, Ramesh Sippy, Sudhir Mungantiwar, Randhir Kapoor, Rajiv Kapoor and Rishi Kapoor at 16th Pune International Film Festival(PIFF) on Thursday, January 11, 2018 at City Pride Kothrud.

Marathi Photo Caption

फोटो ओळ- ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे (पिफ) आज सिटीप्राईड कोथरूड येथे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. या वेळी हिंदी चित्रपटांचे विख्यात दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि एल. व्ही. प्रसाद स्टुडिओचे प्रमुख रमेश प्रसाद यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले, तसेच विविध भाषांमध्ये पार्श्वगायन करून गेली अनेक वर्षे श्रोत्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह साऊंड अँड म्यूझिक’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी मुनगंटीवार यांनी वनविभागातर्फे पिफसाठी साडेअकरा लाखांचा निधी डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे सुपूर्द केला. ​

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आर. के. स्टुडिओला आग लागून त्यात ज्येष्ठ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटांचा मोठा ठेवा भस्मसात झाला. या पार्श्वभूमीवर राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘पिफ’मध्ये ‘राज कपूर रेट्रोस्पेक्टिव्ह’ हा खास विभाग ठेवण्यात आला आहे. या निमित्ताने राज कपूर यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी‘पिफ’मध्ये उपस्थित राहून राज कपूर यांच्या २३ चित्रपटांच्या निगेटिव्ह प्रती चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी पुण्यातील ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’कडे (एनएफएआय) सुपूर्द केल्या.

फोटो क्र. १– ‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ए. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह साऊंड अँड म्यूझिक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) डॉ. जब्बार पटेल, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, सुधीर मुनगंटीवार, रणधीर कपूर, ऋषी कपूर उपस्थित होते.

फोटो क्र. २– ‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी रमेश सिप्पी यांना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) डॉ. जब्बार पटेल, सुधीर मुनगंटीवार, रमेश सिप्पी, राजीव कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर उपस्थित होते.

फोटो क्र. ३– राज कपूर यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी ‘पिफ’मध्ये उपस्थित राहून राज कपूर यांच्या २३ चित्रपटांच्या निगेटिव्ह प्रती जतन करण्यासाठी पुण्यातील ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’कडे (एनएफएआय) सुपूर्द केल्या. या वेळी (डावीकडून) डॉ. जब्बार पटेल, प्रकाश मगदूम, राजीव कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर उपस्थित होते.

फोटो क्र. ४ – ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे (पिफ) आज सिटीप्राईड कोथरूड येथे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी व एल. व्ही. प्रसाद स्टुडिओचे प्रमुख रमेश प्रसाद यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह साऊंड अँड म्यूझिक’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. (डावीकडून) डॉ. जब्बार पटेल, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, रमेश प्रसाद, रमेश सिप्पी, सुधीर मुनगंटीवार, रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर उपस्थित होते.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>