जो कायद्यात राहतो तोच फायद्यात राहतो
वकील उज्ज्वल निकम यांच्या कार्याला समर्पित केलेला चित्रपट ‘आदेश -पॉवर ऑफ लॉ’ दि.6 ऑक्टोबर,2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.वकील आदेश सरोदे,एक गरीब कुटुंबातील मुलगा,अपल्या मेहनातीच्या आणि हुशारीच्या जोरावर कमी काळात प्रसिद्ध होतो.त्याला सरकारकडून खूप महत्वाच्या केसेस मिळत जातात.हैदर अन्सारी केसमध्ये वकील आदेश सरोदे आपले सगळे कसब पणाला लावतात आणि ती केस जिंकतात.सरकार त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करतात.सरकारी वकील आपल्या अशियाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात ,पण त्याच बरोबर त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे समजून घेण्याचा एकतर आपण प्रयत्न करीत नाही किंवा दुर्लक्ष तरी करतो. योगेश वणवे (निर्माता),उद्योजक पुणे यांनी श्री अंबिका माता प्रॉडक्शन* या बॅनरखाली आदेश-पॉवर ऑफ लॉ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुवदन आंग्रे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा सह दिग्दर्शक म्हणून तारे जमीन पर, द मिथ(हॉलिवूड) ,जोधा अकबर,ओम जग जगदीश,तसेच बिल्लू उस्ताद या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.प्रथमच ते एक वेगळा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत ‘आदेश-पॉवर ऑफ लॉ’ निर्मिती संस्था:श्री अंबिका माता प्रॉडक्शन निर्माता-योगेश वणवे,सह निर्माता-कथा-दिग्दर्शन:सुवदन आंग्रे , संवाद:गणेश महिंद्रकर,छाया चित्रीकरण:दिलीपकुमार डोंगरे,संगीत:श्रीरंग आरस ,गीतकार:सचिन निकम,गायक:मिलिंद इंगळे,वैशाली सामंत ,कविता राजहंस,लाईन प्रोड्युसर:दिनेश पुजारी. कलाकार:सुवदन आंग्रे,मुकेश तिवारी,अनंत जोग,अशोक शिंदे,योगेश वणवे,मिथिला नाईक यांनी भूमिका केल्या आहेत.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>