INIFD डेक्कन ने बिग बॉस फेम कवलजीत यांची ” ड्रेपिंग फॅब्रिक ” यावर कार्यशाळा आयोजित

: – प्रसिद्ध बॉलीवूड फॅशन डिझायनर आणि माजी ‘बिग बॉस फेम कवलजीत यांनी inifd डेक्कन येथे ड्रेपिंग फॅब्रिक यावर एक कार्यशाळा आयोजित केली होती . कवलजीत यांनी बॉलीवूड मधील तीन पिढ्यसाठी काम केले आहे . त्यांनी कपूर , खन्ना , कुमार,यांच्यासाठी ड्रेस डिझायनिंग चे काम केले आहे . कवलजीत यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे . त्यांनी आपली फॅशन विश्वात स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे . त्यांनी अमिताभ बच्चन , रेखा , माधुरी दीक्षित , शाहरुख खान , हेमा मालिनी , श्रीदेवी , रविना टंडन , पूनम ढिलों, पद्मिनी कोल्हापुरे , जुही चावला , विनोद खन्ना आणि इतर अनेक कलाकारासाठी त्यांनी डिझाइन केले आहे .
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रॅपिंगचे नवीन तंत्र शिकवले , ड्रापिंगचे महत्त्व आणि ते कुठे आणि कसे वापरावे हे ही सांगितले . आयएनआयएफडी डेक्कनचे संचालक श्रीमती वर्षा चंदवानी यांनी श्री. कावलजीत सिंगयांना सन्मानीत केले. सौ. वर्षा चंदवानी यांनी त्यांच्या फॅशनसाठी, भारतातील ट्रेंड, त्यांच्या वैयक्तिक शैलीतील वक्तव्यांबद्दल आणि अनुभवांसाठी त्यांच्याशी सवांद साधला . मुलांना कवलजीत यांना स्वतःचे काही प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. हि कार्यशाळा संवादात्मक तर होतीच तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक होती .
या तंत्रज्ञानामुळे नवीन फॅशन, शैली , ट्रेंड आणि फॅब्रिकचा वापर, संपूर्णपणे ऑप्टिमायझेशनचा वापर करण्याच्या पद्धती वाढल्या आहेत. ड्रॅपिंग त्यापैकी एक आहे.आॅनिफडीयन तनुजा चांद यांनी एक सत्रात भाषण दिले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . तसेच तेथे रॅम्पवॉक आणि वातावरण अंत्यंत जोशपूर्ण होते .

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>