ऐक्य राष्ट्रीय लघुपट महोसत्व संपन्न

स्व. श्री. संभाजीनाना तुकाराम बेलदरे (मा. सरपंच) प्रतिष्ठान, पुणे आयोजित, पुण्यातील ऐक्य कलाविष्कार आणि कोल्हापूरमधील सह्याद्रीचा छावा या संस्थांनी आयोजित केलेला “ऐक्य राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०१७” हा सोहळा शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी पद्मावती येथील “आण्णाभाऊ साठे सभागृह” येथे पार पडला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, रांजण चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश पवार, सह. दिग्दर्शिका अमीरा शेख (रांजण), राहुल लोहगावकर, नगरसेवक युवराज बेलदरे, अभिनेते प्रशांत बोगम असे मान्यवर ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. कैफियत, भेद आणि द जेनेसिस… अनमेंशन्ड या लघुपटांना प्रथम तीन पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. तसेच पारितोषिक वितरण सोहळ्यात विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील नागपूर,विदर्भ, अमरावती येथील नवीन कलाकार आपली कला सादर करण्यास आले होते. सुश्रुत कोतोलीकर यांच्या दिग्दर्शनाखाली अवघ्या ५ ते ६ दिवसात सर्व कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. ऐक्य कलाविष्कार आणि सह्याद्रीचा छावा या संस्था नवीन कलाकारांना घडविण्याचेच काम करतात. नवीन कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्याची इच्छा ऐक्य कलाविष्कारचे संस्थापक धनंजय अरविंद गवळी यांची आहे आणि त्याच हेतून त्यांनी नवीन कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडला. अशा नवीन कलाकारांना घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थांना योग्य ती मदत करावी आणि नवीन कलाकारांना आपली कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी लागणार मदत आपण करावी अशी विनंती रांजण चित्रपटाचे दिग्द. प्रकाश पवार यांनी मेघराज भैय्यांना केली. ऐक्य कलाविष्कार आणि सह्याद्रीचा छावा या संस्थांनी केलेल्या उपक्रमाबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी धनंजय अरविंद गवळी आणि सुश्रुत कोतोलीकर यांचे कौतुक केले आणि त्यांनी असे उपक्रम कायम सुरु ठेवावे आणि नवीन कलाकार घडवावे अशा शुभेच्छा दिल्या.
रत्नाकर शेळके डान्स क्लासच्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमात नृत्याचे विविध अविष्कार सादर करून कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली. स्व. श्री. संभाजीनाना तुकाराम बेलदरे (मा. सरपंच) प्रतिष्ठान, पुणे आयोजित आणि ऐक्य कलाविष्कार व सह्याद्रीचा छावा निर्मित यांनी केलेल्या ह्या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक युवराज बेलदरे आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पा परांडे यांनी आपल्या विभागात अशा प्रकारचा उपक्रम सुरु केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे अभिनंदन करून पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>