The Nicobar Edit in Pune February 23- February 25 at Terttulia, Koregaon Park

: In the second of many pop-ups this year, The Nicobar Edit is heading West to Pune in the city’s favourite Italian restaurant — Terttulia.

Set in the bustling Pune neighborhood of Koregaon Park, Terttulia is a discerning diner’s essential stop. With its easy sip-beer-all-day vibe, and delicious Italian food, it’s the perfect place to unwind with friends and family and indulge in long, leisurely meals in the sunlit courtyard. Given it’s homey vibe it’s no surprise Nicobar decided to make Terttulia home for three days.

This season they’re all about sunshine, and the tropical modernism of Geoffrey Bawa paired with the all-round lushness of the island just off their Southern coast. The latest edit takes you on a journey into Sri Lanka, deep into the heart of the island, with a play of colours and our very own classic tropical motifs — hello palm trees and pineapples. Modern and playful, there’s bits and bobs here that fit beautifully into your home, your wardrobe, and on your travels.

While rummaging through their clothing racks at Terttulia, expect to find their usual light and bright clothing with hints of a new mood that’s more befitting of a spring transition. Think cool white, inky black, and rich gold paired with graphic stripes and bold florals in all their signature fabrics. If you’re looking to fill up your home with simple yet fun dinner sets and entertaining essentials then you’ll be delighted to find elegant barware, marble cheese boards, and an edit that straddles modern tropicality with ease. You’ll find bamboo baskets and lanterns, brass planters, and aluminium vases in varying light and dark shades reminiscent of Sri Lanka’s sun and shade soaked land. There’s even hints of gold to add some sparkle to your wares for the season. And if your itinerary for the rest of the year has you flying off across the world on wonderful adventures then their utilitarian pants, comfy overlays and multi-functional bags will take you wherever you want to go.

So stop by their weekend abode for cocktails, conversations and a whole lot of discovery.

Date: Friday, February 23rd – Sunday, February 25th, 2018

Timing: 12pm – 9pm

Venue: Terttulia , 393 Sanas Corner, Lane No. 5, South Main Road, Koregaon Park, Pune

Posted in Uncategorized | Leave a comment

पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाची सांगता

मुलांना भाषा चांगली बोलायला, वापरायला शिकवून चांगली पिढी घडवा – डॉ. अरूणा ढेरे
कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – चंगळवाद, प्रलोभनं, नैराश्य, यातून मुलांना फक्त शिक्षकच बाहेर काढू शकतात. प्रत्येक मुलामध्ये एक कथा दडलेली असते. ती समजण्यासाठी शिक्षक ती किती समृद्धपणे घेतो, सकसपणे घेतो यावर सगळं अवलंबून आहे. इतरांपेक्षा शिक्षकांना एक जादा शक्ती भाषेच्या रूपाने मिळाली आहे. शिक्षकांनी करावा. मुलांना भाषा चांगली बोलायला शिकवून त्यांना प्रलोभनं, चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगली पिढी घडवावी असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे यांनी आज येथे केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप प्रसंगी डॉ. ढेरे बोलत होत्या. स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी दिपक माळी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या समारोप समारंभात स्वच्छ भारत अभियानाबद्दल हुजूरपागेची विद्यार्थीनी पूर्वी गवळी हिने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढले आहे. त्याबद्दल पूर्वा व तिच्या पालकांचा यथोचित गौरव डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ अरूणा ढेरे म्हणाल्या, नोबेल पारितोषिक मिळवणारे रविंद्रनाथ यांचे कायम आठवण शिक्षकांनी ठेवले पाहिजे. शिक्षक काय करू शकतो तर शिक्षक एक साहित्यिक घडवतो हे रविंद्रनाथांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची आठवण ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रमाणे आपल्यातही विचार, भावना व्यक्त करणारी आंतरिक ओढ असली पाहिजे. काही झाले तरी मी हे जग सुंदर करून दाखवीन असा आंतरीक दिवा पेटवा असा सल्ला त्यांनी दिला.
जेव्हा सहृदयशक्ती आणि मानसिक शक्ती एकत्र येते तेव्हा साहित्य निर्माण होते असे सांगून त्या म्हणाल्या, साहित्यिक आपल्या भोवतीच्या समाजाला, वातावरणाला स्पष्ट शब्द देऊ शकतो. शिक्षकांना भाषेची देणगी ही त्यांच्या पेशानेच दिलेली असल्याने शिक्षकांनी साहित्यिक व्हावे. साहित्याने दिलेली देणगी मुलांपर्यंत पोचवावी. आपल्या समोर वर्गात असलेल्या नव्या पिढीत साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर न्या. मुलांना चांगली भाषा वापरायला, बोलायला शिकवा
साहित्यिक लहान मुलासारखा असतो. तो कुतुहल दृष्टीने जगाकडे बघतो असे सांगून डॉ. ढेरे म्हणाल्या, त्याने अनुभवलेल्या सुखदु:खांना आणि त्या पलिकडे त्याने गमावलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतो. साहित्यिक पंचेंद्रीयांनी जग अनुभवतो. भोवतीचं जग आपलं करतो म्हणूनच जे सामान्य माणूस पाहू शकत नाही ते साहित्यिक पाहू शकतो. व्यवहारातील भाषेला सर्जनशीलतेच्या पातळीवर नेतो तो खरा साहित्यिक. असा साहित्यिक होण्याच शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि समाजाला दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी केले,
प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे म्हणाले, पूर्वी पगार कमी असला तरी अनेक जण ठरवून शिक्षक झाले. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज नोकरी मिळत नाही म्हणून शेवटी शिक्षकाची नोकरी स्वीकारली जाते. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, व्यसनाधिनता असे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाइलमुळे मुले पालकांच्या हातात राहिलेली नाहीत. हे चित्र बदलण्याची, त्यात परिवर्तन करण्याची ताकद फक्त शिक्षकांच्यात आहे. त्यासाठी त्यांनी आवांतर वाचन, लेखन करण्याची गरज आहे. यासाठी त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून हे शिक्षक साहित्य संमेलन आहे. असे संमेलन पुढच्या वर्षीही होणार असून त्यासाठी महिनाभर अगोदर नाव नोंदणी केली जाणार असून संमेनलाने गांभिर्य व वातावरण चांगले रहावे यासाठी नोंदणी केलेल्यांना संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.
सोबत फोटो आहे.
फोटोओळ – स्वच्छ भारत अभियानाबद्दलच्या राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेत यशस्वी ठरलेली हुजूरपागा शाळेची विद्यार्थीनी पूर्वा गवळी हिच्या चित्राचे टपाल तिकीट काढण्यात आले आहे. त्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा खास गौरव करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे, त्याप्रसंगी डावीकडून डॉ. गणपत मोरे, स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे,
प्रवीण वाळिंबे माध्यम समन्वयक

Posted in Uncategorized | Leave a comment

शिक्षकांचे काव्य संमेलन रंगले

“कविता म्हणजे शब्दांचा फुलोरा नव्हे’
डॉ. अश्विनी धोंगडे यांचे प्रतिपादन
पुणे,दि. 18 ः कविता म्हणजे शब्दांचा फुलोरा नव्हे! मनामध्ये कविता पूर्ण विकसीत झाल्यावरच कवीने शब्दातून व्यक्त व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे यांनी आज येथे केले.
शनिवारवाडा कला महोत्सव व शिक्षण विभाग, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षकांचे काव्य संमेलन रंगले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थनावरुन त्या बोलत होत्या. शिवाजी खांडेकर, शांताराम पोखरकर व अन्य यावेळी उपस्थित होते.
चाळीसहून अधिक शिक्षक कवींनी यावेळी आपल्या बहारदार रचना सादर करुन उपस्थितांची जोरदार दाद मिळवली. शिक्षकांच्या व्यथा, महिलांचे दुःख, आजची बदललेली संस्कृती, मराठीची उपेक्षा आणि अर्थातच शिक्षकांच्या समस्या यांसह प्रेम भावना, भक्ती अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता यावेळी सादर झाल्या.
“ऐकू मराठी, बोलू मराठी…गर्वानं सांगू जगा आहे मी मराठी…’ अशा शब्दांमधून नितिन शिंदे यांनी मराठीची महती गायली. “आयुष्यातून आमच्या विटाळ दूर साराल का?’ असा थेट सवाल करणारी सुनीता काटम यांची स्त्री जीवनाचा कोंडमारा मांडणारी आशयघन कविता जोरदार दाद मिळवणारी ठरली. “मास्तर तुम्ही होतात म्हणून शिकलं माझं पोर…’ या शब्दात शिक्षकांची महती सांगणारी संदीप वाघोले यांनी कविता दाद मिळवून गेली.
“इथे वेदनेला अगं अंत नाही, उरी बांध माझ्या मला खंत नाही…’ या रचनेतून मनीषा खामकर यांनी स्त्री भ्रूण हत्येवर परखड भाष्य करीत श्रोत्यांना अंतःर्मुख केले. मुलगा मुलगी भेद कशाला? करील मुलगा ते मी का करणार नाही? या त्यांच्या कवितेतील ओळी दाद घेऊन गेल्या. गोमू संगतीनं… या गाजलेल्या गीताच्या चालीवर संजय भेंडे यांनी सादर केलेली- सोनू संगतीनं शाळेत येशील का? ही कविता टाळ्या घेणारी ठरली.
“हजेरी नोंदी पाठ टाचणे, पोषण आहार रोज वाटणे… जनगणनेला वणवण फिरणे, अधिकाऱ्यांचे खात टोमणे हससी तू लाचार, शिक्षका होशी तू बेजार…’ अशी शिक्षकांची व्यथा चारुता प्रभुदेसाई यांनी आपल्या कवितेतून रोखठोक मांडली. बाबासाहेब ढोबळे, प्राचार्य दिलीप गोरे, संध्या पाटील, व्यंकटेश देशमुख, नवनाथ गाडेकर, उज्वला हातांगळे, मदन व्हावळ, रुपाली काळे यांसह अन्य कवींनी कविता सादर केल्या.
शिक्षक साहित्य संमेलन शिक्षकांच्या सर्जनशीलतेला चांगले व्यासपीठ मिळवून देणारे आहे, असे डॉ. धोंगडे यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या- कविता केवळ चांगली असून चालत नाही, ती उत्तमरित्या लोकांपर्यंत पोहोचवावी लागते! कविता करणे हा हौसेचा भाग राहू नये. कविता केली नाही तर कोडंल्यासारखे वाटत असेल, तरच तिला शब्दांद्वारे वाट करुन द्यावी. कविता ही स्वतःसाठी आनंदाचे निधान असले पाहिजे! कविता ही कला आहे आणि कलेत केवळ सौंदर्य असून भागत नाही. थोडी कारागिरी करावीच लागते. शिक्षकी पेशामुळे आपल्या प्रत्येकाला रोज नवी आणि ताजी दृष्टी मिळते. म्हणूनच सर्जनाची अधिक संधी शिक्षकांना आहे.
“असेन ज्या घरात, त्या घटाच्या रंगरुपाची, मी पाण्याच्या जातीची’ ही आपली प्रसिध्द कविता डॉ. धोंगडे यांनी यावेळी सादर करुन कवी संमेलनाला शिखरावर नेले.
भालचंद्र कोळपकर, प्रा. विजय लोंढे आणि प्रा. विजय अंधारे यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कवी संमेलनाची

Posted in Uncategorized | Leave a comment

Granth Dindi Photo Caption :
1st Shikshak Sahitya Sammelan Granth Dindi from Shaniwar Peth to Balgandharva Rang Mandir. The photos of Palkhi and Poojan of Maha Maho Padhyay, DV Potdar and Poojan of Photo of Late Maha Maho Padhyay.

Lightning of Lamp Photo Caption:
Inauguration of 1st Shikashak Sahitya Sammelan by lightening of lamp
(L-R)
Dr. Sadanand More, Dr. SB Mujumdar, Vijay Kale (MLA), Dr. NM Joshi, Bhagwanrao Salunke (Ex MNC), Pramod Shinde etc.

Posted in Uncategorized | Leave a comment

मूल्ये शिकवता येत नाहीत रूजवावी लागतात……
मुलांबरोबर पालकांनाही मूल्यशिक्षणाचे हॅमरींग करण्याची वेळ !
कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – वेगाने विकसित होत असलेले तंत्रज्ञान, त्यातून मुलांपुढे येणारी तंत्रज्ञानाने येणारी नवीनवी प्रलोभने, विभक्त व न्यूक्लिअर कुटुंब पद्धती, बदलती सामाजिक, आर्थिक परिस्थिती या सगळ्याच्या चौफेर मा-यामुळे नव्य नव्य समस्या मुलांबाबत तयार होत आहेत. त्यामुळे मुलांसारखेच मूल्य शिक्षण पालकांनाही आता शिक्षकांनीच बंधनकारक करून मूल्य शिक्षण द्यावे. मूल्यांचे केवळ शिक्षण न देता त्याचे हॅमरिंगच करावे लागणा आहे, असे परखड मत कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत रंगलेल्या परिसंवादात आज मान्यवरांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी “सत्रात मूल्याशिक्षण काळाची गरज” या विषयावरील परिसंवाद रंगला. या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक ज्योतिराम कदम, रमणबाग शाळेतील शिक्षिका सौ. चारूलता प्रभूदेसाई, कवी तथा मुंबई बोर्डाचे सचिव अनिल गुंजाळ, सौ. सुशिलाबाई वीरकर शाळेतील शिक्षिका स्मिता ओव्हाळ आदी सहभागी झाले होते.
सर्वच वक्त्यांनी बोलताना त्यांचे विद्यार्थी, पालकांबद्दलचे अनुभव सांगून मूल्य शिक्षणाची गरज कशी आहे हे सांगितले. ज्योतिराम कदम म्हणाले, मुंबईच्या शिरोडकर हायस्कूलमधील शिक्षकांनी रूजवलेल्या मूल्यांमुळेच मी बालचित्रवाणीत निर्माता म्हणून काम करू शकलो. संवाद लेखनच्या विषयात बैलगाडी व आगगाडी यांच्यातील संवाद लिहिण्याची वेळ आली तेव्हा संवादासाठी दोन्ही गाड्या समोरासमोर कुठे येतात हे शोधण्याची सूचना बाईंनी केली. इतक्या साध्या साध्या पद्धतीने मूल्य रूजवण्याचे काम शिक्षक करत होते. पण त्याच शिरोडकर हायस्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून वर्गात गेल्यावर मुलांना आपण शिक्षक आहोत ते सांगावे लागले. प्रत्येक मुलात समस्या असताताच पण त्या मुलांच्या मनात घुसण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करून मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत केली तरी त्यांच्यावर नकळत मूल्य संस्कार होतात. त्या आशयाची गोष्टही त्यांनी सांगितली.
अनिल गुंजाळ म्हणाले, मुलांच्या मूल्येही शिकवून भरता येत नाहीत तर ती संस्कारातून रूजवावी लागतात. सध्याच्या टीव्ही, मोबाइल, इंटरनेटच्या युगात मुलांना केवळ मूल्य शिक्षण केवळ दिवसातून एकदा देऊन चालणार नाही तर अधुनिक तंत्रज्ञानासारखेच मूल्य शिक्षणही हॅमर करावे लागणार आहे. आज केवळ मुलांना मूल्य शिक्षण शाळेत देऊन चालणार नाही तर मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही मूल्य शिक्षण देण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनी त्यासाठी पालकांसाठी उपक्रम करावेत आणि त्यात सहभागी होणे पालकांना बंधनकारक करावे. आपण कनिष्ठ महाविद्यालयीन मुलांसाठी काम करताना त्यांनी भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीयता, व्यसनाधिनता आणि आत्महत्येपासून लांब रहा असे सांगतो. जेव्हा शिक्षकांनी शिकवलेला इंजिनिअर झालेला मुलगा कंपनीत मुलगी बोलत नाही म्हणून आत्महत्या करतो हा शासन, शिक्षण, शिक्षक अशा आपल्या सर्वांचाच दोष आहे त्यामुळे आपण सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे कारण शिक्षक हा सामाजिक अभियंता (सोशल इंजिनिअर) आहेच.
स्नेहलता प्रभूदेसाई म्हणाल्या, मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी, पैशासाठी घराच्या बाहेर असणारे आईवडील, अशा पालकांकडून केले जाणारे मुलांचे फाजील लाड, मुलांचे एकटे घरात रहाणे, नकार पचवण्याची सवय नसणे किंवा समस्यांचा सामना कऱण्याची सवय नसणे अशा परिस्थितीमुळेच मूल्य शिक्षणाची गरज निर्माण झाली. शासनाने मूल्य शिक्षणाबद्दलची मार्गदर्शक तत्वेही घालून दिली. आज विविध प्रलोभनांमुळे मुले सैरभैर झालेली वाटत असली तरी त्यांच्यातही संवेदनशीलता असतेच फक्त त्या संवेदनशीलतेला दिशा योग्य देण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्यातून नव्हे तर संस्कारातून मूल्य रूजवण्याचे करावे. याबाबतचे त्यांनी काही अनुभवही सांगितले.
स्मिता ओव्हाळ म्हणाल्या, एक शिक्षक काय करू शकतो तर एक चांगली व्यक्ती घडवू शकतो. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे आपण स्वत: आहोत. मुंबईच्या शिरोडकर शाळेत शिकत असताना ज्योतिराम कदम सर आपल्याला शिकवायला होते. त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच आज आपण त्यांच्याबरोबर या परिसंवादात सहभागी होऊ शकलो. आपण आपले काम चांगल्या पद्धतीने करावे हे संस्कार आपल्याला शिक्षकी पेशात उपयोगी पडत आहेत. त्यामुळे आपण शिक्षकांनी मूल्य शिक्षण म्हणजे केवळ शासनाने सांगितलेले शिकवण्याबरोबरच आपल्या कृतीतून आपले काम प्रामाणिकपणे व चांगल्या पद्धतीने करू या. त्यातून चांगली पिढी निर्माण होऊ शकेल.
संमेलनाच्या उदघाटनानंतर मन:शक्ती केंद्राच्या प्रमोद शिंदे यांनी शिक्षकांनी त्यांच्या रोजच्या धावपळीत मन:शक्ती कशी टिकवावी व वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर दै. सकाळचे संपादक मल्हार आरणकल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कथाकथनच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कथा सादर केल्या. काही कथांना सर्वांचीच चांगली दाद मिळाली. ही सुरूवात आहे. यातूनच पुढे मोठ्या संख्येने शिक्षक चिंतन, लेखन करायला लागलीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Posted in Uncategorized | Leave a comment

Sikh practioners paying attention to morning religious proceedings!!.

Posted in Uncategorized | Leave a comment

Pious Sikh in Saffron in deep medidation!!!

Posted in Uncategorized | Leave a comment

Mid day meals for Tiny Tots!@

Posted in Uncategorized | Leave a comment

Students munchin their mid day meals!!!

Posted in Uncategorized | Leave a comment

Pinky Pink catch ones gaze!!!

Posted in Uncategorized | Leave a comment